घरमुंबईचर्चगेटचे ते वैद्यकीय केंद्र सुरू होणार

चर्चगेटचे ते वैद्यकीय केंद्र सुरू होणार

Subscribe

चर्चगेट स्थानकाबाहेर रेल्वे प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या आपत्कालीन वैद्यकीय केंद्रावर २ ऑगस्ट २०१९ रोजी झाड कोसळून लाखो रूपयाच्या चुराडा झाला आहे.त्यामुळे दोन महिन्यांपासून हे वैद्यकीय केंद्र बंद पडलेले होते. प्रवाशांनी तक्रारी करून सुध्दा पश्चिम रेल्वे या दुरवस्थेची दखल घेत नव्हती.

मात्र यासंबंधीत ‘दैनिक आपलं महानगर’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर झोपी गेलेल्या रेल्वे प्र्रशासनाला खडबडून जाग असून वैद्यकीय केंद्र उभारण्यासाठी नवी जागा पश्चिम रेल्वेने शोधली आहे. येत्या एका महिन्यात नवीन वैद्यकीय केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याचे काम सुध्दा सुरू झाले आहे. येत्या एका महिन्यात प्रवाशांसाठी आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकार रविंद्र भाकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

रेल्वे अपघातातील जखमी आणि रेल्वे प्रवासात अचानक प्रवाशांची प्रकृती खराब झाल्यास त्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा रेल्वे स्थानकांवर मिळावी यासाठी सर्व रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरू करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. मात्र, आज सुध्दा कित्येक रेल्वे स्थानकांवर वैद्यकीय केंद्र नाही. ज्या स्थानकांवर वैद्यकीय केंद्र आहेत तिथे सेवा सुरळीत सुरू नाही. चर्चगेट स्थानकातील केंद्र असेच दुरवस्थेत होते.

मात्र या घटनेत आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद करण्यात आले,याची दुरूस्ती करावी अथवा नवीन केंद्र उभारणे गरजेचे होते. मात्र दोन महिने झाले तरीही पश्चिम रेल्वे फक्त जागा शोधत असल्याचे कारण देत आहे. यासंबंधी प्रवाशांनी तक्रारी केल्या. मात्र यावर अद्यापही पश्चिम रेल्वेने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या कारभारवर नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -