परिक्षेदरम्यान दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

सायलीचा मृत्यू अभ्यासाच्या ताण-तणावातून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे

Mumbai
परिक्षेदरम्यान दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

वाशी येथे असणाऱ्या मॉर्डन शाळेत एक दुर्दैवी घटना घडली. मंगळवारी सकाळी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेतच मृत्यू झाला. चाचणी परीक्षा देण्यासाठी शाळेत गेली असताना या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सायली अभिमान जगताप असे या विद्यार्थिनीचे नाव असून सायलीचा मृत्यू अभ्यासाच्या ताण-तणावातून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

असा घडला प्रकार

मॉडर्न शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा सुरू असताना सायली मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे परीक्षेसाठी शाळेत गेली होती. बॅग घेऊन परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला. मात्र, बॅग नेण्यास परवानगी नसल्याने शिक्षकांनी सायलीला बॅग वर्गाबाहेर ठेवण्यास सांगितले. त्यानुसार सायली वर्गाबाहेर बॅग ठेवण्यासाठी गेली असता त्या ठिकाणी अचानक कोसळून खाली पडली. यावेळी फिट आल्याचे समजून शाळेतील शिक्षकांनी तिला वर्गात आणले. नंतर तिला वोक्हार्ट रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी साय़ली मृत असल्याचे सांगितले.

सायली अभ्यासात हुशार असल्याने तिच्या अचानक जाण्याने सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here