येत्या १५ ऑक्टोबरला लोकल सुरू ? काय म्हणाले मुख्यमंत्री

मुंबईत लोकल सेवा कधी सुरू होणार हा सगळ्यांना अतिशय कुतुहलाचा विषय ठरत आहेत. काही दिवसांपूर्वी १५ ऑक्टोबरच्या दरम्यान लोकलसेवा सुरू करण्याबाबतचे संकेत एका मुलाखतीच्या माध्यमातून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. मात्र आजच्या मुख्यमंत्र्यांच्या जनतेच्या संवादातून मुंबई लोकलबाबतच्या अनेक गोष्टींचा उलघडा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

आपण रेल्वे राज्याअंतर्गत सुरू केली आहे. लोकलची फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी आम्ही राज्य सरकार म्हणून केंद्राकडे मागणी केली आहे. मला गर्दी नकोय. सगळ्यांनाच लोकलने जायच आहे. लोकलशिवाय जाणार कस ? रेल्वेमध्येही आपण लोकलची संख्या वाढवून मागतो आहोत. ती वाढल्यानंतर आपण अधिक लोकांना प्रवास करायला देऊ. राज्याअंतर्गत रेल्वेची वाहतूक सुरू झालेले आहे. रस्त्यावरच ट्रॅफिक हळूहळू सुरू झालेले आहे. दुकाने सुरू झाली आहेत. कार्यालयांमध्येही हळूहळू उपस्थिती वाढवतो आहोत.

आता रेस्टॉरंट ओपन केली आहेत. जिम चालकांसोबत मी बोलतोय, त्यांनाही काही नियमावली आपल्याला द्यावी लागेल. आरोग्याच्या दृष्टीने हार्टचा पंपिंग रेट वाढणे हे जिममध्ये होते. त्यामधून श्वासोश्वास जोरात होतो. त्यामुळे त्यासाठी काय खबरादारी घेता येईल यावर विचार सुरू आहे. रेस्टॉरंटमध्येही बसण्यासाठीची उपाययोजना आपण सांगितलेली आहे. त्यामध्येही समोरासमोर न बसता शेजारी बसून रेस्टॉरंटचा वापर करा असे आपण सुचविले आहे.

आपण सार्वजनिक सेवा म्हणजे बसचा वापर करतो तेव्हा एकमेकांशी जास्त बोलू नका. शिवाय मास्क वापरताना तो पुर्णपणे वापरा. उगाच लावायचा म्हणून मास्क वापरू नका. आपले हात, डोळे आणि चेहऱ्याला कमीत कमी इतरांच्या संपर्कापासून बचाव करा. त्यामुळेच आपण मास्क वापरण्याची आणि हात धुण्याची सवय ठेवा हे आवाहन करत आहोत. मास्क न वापरणे, वैयक्तिक स्वच्छता न ठेवणे यासारख्याच गोष्टी आपल्याला आता भारी पडत आहेत असे ते यावेळी म्हणाले.