घरमुंबई'दुष्काळमुक्तीसाठी कॉर्पोरेट संस्थांचं सहकार्य हवं'

‘दुष्काळमुक्तीसाठी कॉर्पोरेट संस्थांचं सहकार्य हवं’

Subscribe

दुष्काळमुक्त महाराष्ट्र मोहिमेत खासगी तसंच कॉर्पोरेट संस्थांनी देखील सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्यातील छोटी धरणे, तलाव यामधील गाळ काढून तो शेतात टाकल्यावर कृषी उत्पादनात वाढ होताना दिसून आले आहे. त्यामुळे या वर्षी ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजने’च्या माध्यमातून १५ हजार छोट्या मोठ्या धरण आणि तलावातील गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवावे. पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असल्याने तो अडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. भविष्यात पाऊस कमी झाला तरी दुष्काळाचे चटके राज्याला जाणवणार नाही आणि हीच खरी दुष्काळमुक्तीची संकल्पना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. या योजनेसाठी शासनाला खासगी कार्पोरेट कंपन्यांनी सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.सह्याद्री अतिथी गृह येथे दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलसंवर्धन करण्यासाठी खासगी संस्थांचे सहकार्य घेण्याबाबत बैठक झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम करणारे अभिनेता आमीर खान आदी यावेळी उपस्थित होते. 


 वाचा: लोकसभेत मात्र ‘भाजप’ येणार – दानवे


मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेसोबतच ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना’ महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून हाती घेतला आहे. धरण आणि विविध पाणी साठ्यातून गाळ काढून तो शेतकऱ्यांना दिला जातो. त्याच्या माध्यमातून शेतीमध्ये सुपीकता आणून कृषी उत्पादन वाढविण्यासाठीही त्याचा लाभ होतो. या वर्षी महाराष्ट्र दुष्काळाचा सामना करतो आहे. त्यामुळे ही योजना मोठ्या प्रमाणावर राबविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. यावर्षी किमान १५ हजार पाणी साठ्यामधील गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवावे. 
‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजने’साठी जिल्हा प्रशासनातर्फे यंत्रसामुग्री आणि डिझेल पुरविले जाते. या कामासाठी कार्पोरेट संस्था पुढे येऊन काही जिल्हे दत्तक घेतले तर मोठ्या प्रमाणावर त्याचा लाभ होईल. दुष्काळमुक्त महाराष्ट्र मोहिमेत खासगी संस्थांनी देखील सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

- Advertisement -

वाचा : ‘मेगा’ भरतीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा


अभिनेते आमीर खान म्हणाले, ज्याप्रमाणे नृत्य, गायन याच्या स्पर्धा घेतल्या जातात, त्याप्रमाणे पाणलोट क्षेत्र विकासाच्या स्पर्धा वॉटर कपच्या माध्यमातून आम्ही घेतल्या आणि त्याला गावांनी भरभरुन प्रतिसाद दिला. तीन तालुक्यांपासून सुरुवात केलेल्या या मोहिमेत 30 तालुके आणि त्याच्या नंतर आता 75 तालुक्यांनी सहभाग घेतला. लोकसहभागाची ही मोठी चळवळ बनल्याचे त्यांनी सांगितले. आता शाळांमधून मुलांना जलसंधारणाच्या चळवळीबाबत मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -