घरमुंबईमहाराष्ट्रात डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त

महाराष्ट्रात डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त

Subscribe

केंद्र सरकारने पेट्रोलचा दर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना तूर्तास दिलासा मिळाला होता. त्यातच आता डिझेलचे दरही ४ रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये दिली.

केंद्रापाठोपाठ राज्यात पेट्रोलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात करण्याचा निर्णय काल घेतल्यानंतर आता डिझेलच्या दरांमध्येही लिटरमागे ५६ पैशांच्या कर सवलतीसह एकूण १ रुपये ५६ पैशांनी कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. यामुळे राज्यात आता डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त होणार असून राज्यातील जनतेला आणखी दिलासा मिळाला आहे.

वाढत्या इंधनाच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अक्षरश: मुश्किल झाले होते. मात्र, केंद्र सरकारने पेट्रोलचा दर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना तूर्तास दिलासा मिळाला होता. त्यातच आता डिझेलचे दरही ४ रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये दिली. महाराष्ट्र पोलीस अकादमीचा शुक्रवारी ११५ वा दीक्षांत सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -

काय म्हणाले मुख्यमंत्री?

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी केले. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोलवरील करात कपात केली. त्यामुळे राज्यात पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त झाले. आता डिझेलचे दरही आणखी दीड रुपयांनी कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार मिळून एकूण चार रुपयांनी डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.

राज्य सरकारला आर्थिक फटका बसणार

राज्य सरकारला याचा आर्थिक फटका बसणार आहे. तरीही नागरिकांसाठी आम्ही हा फटका सहन करणार असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश केल्यास दरात तफावत राहणार नाही. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पेट्रोल डिझेलला जीएसटीमध्ये आणण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. इंधनाचे दर आटोक्यात आणण्यासाठी तेल कंपन्यांच्या किंमत धोरणात सुधारणा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यादृष्टीने केंद्र सरकार काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -