घरमुंबईहल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हे देखील कळत नाही - मुख्यमंत्री

हल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हे देखील कळत नाही – मुख्यमंत्री

Subscribe

हल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हे देखील कळत नाही. आम्हाला देखील माहीत नसतं की आमच्या पक्षात कोण येणार ते. आम्हाला पेपरवाल्यांकडूनच दुसऱ्या दिवशी समजते, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सध्या भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून, उद्या अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र यांनी हल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हे कळत नसल्याची कोपरखळी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मारली. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधान गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

हल्ली कोण कोणत्या पक्षात आहे हे देखील कळत नाही. आम्हाला देखील माहीत नसतं की आमच्या पक्षात कोण येणार ते. आम्हाला पेपरवाल्यांकडूनच दुसऱ्या दिवशी समजते, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. एवढच नाही तर अलीकडच्या काळात कुणासोबत फोटो काढायलाही भीती वाटते, असे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या पुस्तक प्रकाशनाला शरद पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक दिगग्ज उपस्थित होते.

- Advertisement -

हर्षवर्धन पाटील यांची केली स्तुती

दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधान गाथा’ या पुस्तकाचे कौतुक केले. विधिमंडळ कामकाजाची नीट ओळख होऊ शकते, असे पुस्तक हर्षवर्धन पाटील यांनी लिहिले असे सांगत विधान मंडळ कामकाजाच्या हॅन्ड बुक म्हणजे विधान गाथा हे पुस्तक असल्याचे त्यांनी सागितले.


हेही वाचा – गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावर भाजपमध्येच नाराजी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -