हर्षवर्धन पाटील हे काँग्रेससाठी बुलेटप्रूफ जॅकेट होते – मुख्यमंत्री

काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Mumbai
cm mahajanadesh
देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

काँग्रेसचे इंदापूरमधील प्रभावी नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करतानाच ‘गेल्या ५ वर्षांपासून आम्ही या प्रवेशाकडे डोळे लावून बसलो होतो’, असं देखील झालं. त्यासोबतच भाजप मोठ्या संख्येने जागा निवडून आणणार असून त्यामध्ये आता इंदापूरचा देखील समावेश झाला आहे’, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी इंदापूर मतदारसंघातल्या समस्या आणि पाणीप्रश्नावर उपाययोजना करण्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी हर्षवर्धन पाटील यांना दिलं. दरम्यान, यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेस सरकारच्या काळात बुलेटप्रूफ जॅकेट म्हणून काम केलं, असं मुख्यमंत्री म्हणले.


हेही वाचा – ‘शेजाऱ्यांकडे जरा बघा’, हर्षवर्धन पाटील यांचा बारामतीवर निशाणा!

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सरकारच्या काळात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसाठी बुलेटप्रूफ जॅकेट म्हणून काम केलं. आमच्या प्रश्नांच्या बुलेट सरकारच्या दिशेने जायच्या, त्या आधी हर्षवर्धन पाटील झेलायचे आणि नंतर त्या पुन्हा आमच्याकडे आणून दिल्या. शिवाय सामंजस्याने प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कायमच कल राहिला आहे. संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी कायमच सर्वांना सोबत घेऊन विधानसभेत काम केलं’, असं मुख्यंमत्री यावेळी म्हणाले.