घरमुंबईअडथळे निर्माण करणार्‍यांनी गती मोजू नये

अडथळे निर्माण करणार्‍यांनी गती मोजू नये

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विरोधकांवर टीका . नव्या पत्रीपुलाचे लोकार्पण

केंद्राच्या अनेक संस्थांकडे राज्याची कामे अडकून आहेत. एकीकडे अडथळ्यांची शर्यत करायची आणि मग आपली गती मोजायची अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

कल्याणातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा नवीन पत्रीपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ऑनलाईनद्वारे करण्यात आले. त्यावेळी कल्याण डोंबिवलीतील विकासकामांवर भाष्य करतानाच त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

- Advertisement -

काम करताना एखाद्याच्या तंगड्यात तंगडं घालून पुढे जाऊ द्यायचे नाही आणि दुसरीकडे नावेही ठेवायची. नावे ठेवणे ही सोपी गोष्ट असून अशा व्यक्तींनी आपले नाव कशाला दिले जाईल का? आपले पुढे काय होणार याचाही विचार केला पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचे कान उपटले. विकासकामे मग ती केंद्राची असो की राज्य सरकारची, त्यातील अडथळे दूर होणे महत्त्वाचे आहे.

तर नविन पत्रीपुलाच्या कामाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएसआरडीसी अधिकारी राधेश्याम मोपलवार आणि रेल्वेच्या अधिकार्‍यांचे कौतुक करत अत्यंत उपयोगी काम विक्रमी वेळेमध्ये पूर्ण केल्याबद्दल शाबासकीची थाप दिली. तर या कामाप्रमाणे शिळफाटा रस्त्याचे कामही आपल्याला विक्रमी वेळेमध्ये पूर्ण करून दाखवा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी एमएसआरडीसी अधिकार्‍यांना दिले.

- Advertisement -

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मनसेकडून कौतुक
काम थोडे लेट झाले का असेना परंतु काम होणे महत्त्वाचे असते. जर आम्ही विरोधी पक्ष म्हणून सतत ठेका धरला नसता तर पत्रीपुलाचे काम हे कदाचित अजून उशिरा झाले असते. विशेष करून मनसेचा हेक्यामुळे सत्ताधारी पक्षाने हे काम पूर्ण करून घेण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली, हे मात्र खरे. खासकरून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी प्रचंड पाठपुरावा केल्याचे दिसून येते आणि मग त्यांना पूर्णत्वास आलेल्या गोष्टीचे श्रेय घेण्याचा पूर्ण अधिकार बनतो आणि ते श्रेय मागच्याच वेळेला आम्ही त्यांना दिलेले देखील आहे. अशा शब्दात मनसेचे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -