मुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी

CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अवघ्या काही मिनिटात ते मातोश्री निवासस्थानावरुन सोलापूरला रवाना होती. त्यानंतर ते विमानाने सोलापूरला जातील आणि तिथून पुढे गाडीने सांगवी आणि अक्कलकोटला जातील. नुकसानग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यानंतर बुधवारी (21ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्ष विभागाने मुख्यमंत्री हे बुधवारी उस्मानाबाद जिल्हा दौरा करणार असल्याची माहिती दिली.

उद्धव ठाकरे हे आज सकाळी 9 वाजता सोलापूर विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर सकाळी 10.15 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव आणि अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करतील. तसेच शेती पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करतील. त्यानंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पूरपरिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी 1.45 वाजता मुंबईकडे जाण्यासाठी ते सोलापूरच्या दिशेने रवाना होतील.

हेही वाचा –

माजी मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, भाजपच्या महिला उमेदवाराला म्हणाले आयटम!