Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुख्यमंत्री उद्या अजयसोबत पाहणार 'तान्हाजी'

मुख्यमंत्री उद्या अजयसोबत पाहणार ‘तान्हाजी’

Related Story

- Advertisement -

मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारणार अभिनेता अजय देवगण एकत्र ‘तान्हाजी’ चित्रपट पाहणार आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, महापालिकेचे अधिकारी आणि नगरसेवकांसाठी मंगळवारी दादर मधील प्लाझा या चित्रपटगृहात संध्याकाळी ६ वाजता ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाचा शो आयोजित करण्यात आला आहे.

तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘तान्हाजी’ या चित्रपटाची क्रेझ सगळ्यांमध्येच पाहायला मिळत आहे. नेते मंडळींनी देखील हा चित्रपट आवर्जुन पाहिला आहे. सोमवारी सिटी सेंटर मॉलमध्ये राष्ट्रवादीचे नेते व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ‘तान्हाजी’ चित्रपट पाहिला. छगन भुजबळ यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर ‘तान्हाजी’च्या पोस्टरपुढे उभं राहून देखील सेल्फी काढला आहे.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, सैफ अली खान, शरद केळकर, अजिंक्य देव आणि अभिनेत्री काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस पूर्ण झाले असून अजूनही चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसत नाही आहे. फक्त १० दिवसांमध्ये १६७.४५ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे.


हेही वाचा – ‘तान्हाजी’ चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थ्याने मागितली सुट्टी


- Advertisement -

 

- Advertisement -