घरमुंबईआचारसंहितेने एसटी बसेसचा मेकअप उतरवला

आचारसंहितेने एसटी बसेसचा मेकअप उतरवला

Subscribe

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहे. त्यामुळे देशभरात निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीवर लावलेल्या जाहिराती काढण्यात आल्या आहेत. या जाहिरातींबरोबर एसटींचा रंगसुद्धा निघाल्याने एसटीचा मेकअप उतरला आहे. त्यामुळे पूर्वी कोट्यवधी रुपयात तोट्यात असलेल्या एसटीला अजून नुकसान सोसावे लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर आणि निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार देशभरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेवर व सार्वजनिक ठिकाणी पोस्टर किंवा बॅनर लावता येत नाहीत.

राजकीय जाहिरातींचे पोस्टर लावता येत नाही. किंबहुना लावला असेल तर काढावा लागतो. त्यामुळे आता एसटी महामंडळाने आपल्या ९ हजारपेक्षा जास्त एसटी बसेसला लावलेल्या जाहिरातींचे पोस्टर्स काढण्यात आले आहेत. त्यामुळे त्यासोबत महागडा रंगसुद्धा जाहिरातीबरोबर निघाला. एसटी महामंडळ कोट्यवधीच्या तोट्यात आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळ जाहिरातींच्या माध्यमातून हा तोटा भरून काढण्याच्या प्रयत्न करते.

- Advertisement -

एसटी महामंडळात सध्या १८ हजार बसेस आहेत. प्रत्येक बसला रंग काढण्यासाठी एसटीला साधारण १५०० ते २५०० हजार रुपयांचा खर्च येतो. सध्या एसटी महामंडळाच्या साधारणत: ९ हजारपेक्षा जास्त एसटी बसेसला जाहिरात चिकटविल्या असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली आहे. मात्र या जाहिराती चिकटविण्याच्या वेळी एसटी बसेसला लागणार रंग निघणार नाही याची दक्षता घेतली जाते आणि ठराविक वेळेनुसार या जाहिराती सुद्धा काढण्यात येतात. आचारसंहितामुळे एसटी महामंडळाला या जाहिराती काढाव्या लागल्या आहे. त्यामुळे एसटीचे यात मोठे नुकसान झाले आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -