घरमुंबईआता कॉलेजनाही हवीय फी वाढ

आता कॉलेजनाही हवीय फी वाढ

Subscribe

मुंबईसह राज्यातील शाळांकडून आकारल्या जाणार्‍या शुल्क बदलांचे वारे वाहू लागले असतानाच आता मुंबई विद्यापीठ संलग्न कॉलेजांना देखील फी वाढ हवी आहे.

मुंबईसह राज्यातील शाळांकडून आकारल्या जाणार्‍या शुल्क बदलांचे वारे वाहू लागले असतानाच आता मुंबई विद्यापीठ संलग्न कॉलेजांना देखील फी वाढ हवी आहे. यासंदर्भात मुंबईतील अनेक प्राचार्यांच्या संघटनांनी विद्यापीठात आकारण्यात येणार्‍या फीमध्ये बदल करण्याची मागणी केली असल्याचे वृत्त ‘महानगर’च्या हाती आले असून आता विद्यापीठ याबाबत काय निर्णय घेतेय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अनेक कॉलेजांकडून आकारण्यात येणार्‍या अव्वाच्या सव्वा फी वाढीला ही लगाम लावता येईल, यादृष्टीकोनातून ही मागणी केल्याची माहिती दक्षिण मुंबईतील एका प्राचायांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठ संलग्न कॉलेजांची संख्या ही ८०० वर पोहचली असून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणारी फी ही २००८-०९ च्या नियमानुसार ठरविली जाते. त्यानुसार कॉलेजांकडून फी आकारली जात आहे. काही कॉलेजांकडून या नियमांना केराची टोपली दाखवून अवाच्या सव्वा फी आकारली जाते. पण दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून वाढत असलेल्या महागाईमुळे गेल्या अनेक वर्षांपासून फी वाढीच्या मागणीसाठी मुंबई विद्यापीठातील सलंग्न कॉलेजांनी मागणी लावून धरली होती.

- Advertisement -

मात्र त्यास विद्यार्थी संघटनांनी केलेल्या विरोधामुळे २००८ – ०९ च्या नियमानुसारच फी आकारली जात आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे पुन्हा एकदा कॉलेजांकडून फी वाढीसंदर्भात मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. ही वाढ करताना विद्यापीठाकडून सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार शिक्षण शुल्क समिती नेमण्याची मागणी करुन ही नवी फी वाढ करावी अशी मागणी केली असल्याची माहितीही यावेळी अनेक प्राचार्यांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना दक्षिण मुंबईतील एका नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही जुन्याचा नियमानुसार फी आकारात आहोत. मात्र सध्या वाढलेल्या महागाईमुळे कॉलेज चालविणे जिकरीचे झाले आहे. ज्यावेळी अत्याधुनिक सोयी सुविधा विद्यार्थ्यांना पुरवाल्या जातात. त्यासाठी फी वाढ गरजेची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फी जुनीच आहे. सध्या अनेक कॉलेजांमध्ये कायमस्वरुपी प्राध्यापक नाहीत. त्यामुळे या प्राध्यापकांचा पगार देताना आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच आम्ही फी वाढीसंदर्भात मागणी केल्याची माहिती या प्राचार्यांकडून देण्यात आली आहे.

 

आपल्याकडे अद्याप कॉलेजांचे कोणतेही पत्र आलेले नाही. मात्र नव्या विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ पातळीवर फी नियत्रंण शुल्क समिती स्थापन करण्याचे काम सध्या अंतिम टप्यात असून लवकरच ती गठीत केली जाणार आहे.
– दिनेश कांबळे, प्रभारी कुलसचिव, मुंबई विद्यापीठ

२००८-०९ च्या नियमानुसार असणारी फी बीकॉम आणि बीएच्या अभ्यासक्रमासाठी
प्रथम वर्ष -३९७०
द्वितीय वर्ष – ४५००
तृतीय वर्ष – ३९५०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -