घरमुंबईराव कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिलासा

राव कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिलासा

Subscribe

भाटिया कॉलेजातून भरणार अर्ज

प्रवेश अर्जा न भरल्यामुळे अडचणीत आलेल्या आयआयटी राव कॉलेजाच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी अखेर दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांना अखेर नजीकच्या भाटीया कॉलेजातून अर्ज भरण्याची परवागी देण्यात आली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार होते. अखेर याप्रकरणी युवा सेनेने गुरुवारी आंदोलन करीत आक्रमक पवित्रा धारण केला होता. त्यानंतर अखेर शाळा प्रशासनाने याबाबत निर्णय जाहीर करीत विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा दिला आहे.
बोरिवली येथील आयआयटी राव ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज न भरल्याने बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज न भरल्याने त्यांचे प्रवेश अचडणीत आले होते. त्यामुळे त्यांच्या बारावीच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे प्रकरण नुकतेच उजेडात आले आहे. याप्रकरणी शिवसेनेने शिक्षण उपसंचालक विभागाकडे धाव घेतली होती. मात्र त्यानंतरही हा प्रश्न अद्याप निकाली न निघाल्याने शिवसेनेकडून गुरुवारी शाळेवर मोर्चा काढला होता. यात पालक देखील सहभागी झाले होते. बोरिवली येथील आयआयटी राव कनिष्ठ कॉलेजात बारावीचे शिक्षण घेणार्‍या सुमारे बाराशे विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत परीक्षा अर्ज भरता आलेले नाही. अर्ज भरण्यासाठी कॉलेजने विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतले आहे. तरीही अर्ज भरून घेण्यात येत नसल्याने पालकांनी युवा सेनेच्या सदस्यांकडे आपली व्यथा मांडली. युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी शिक्षण उपसंचालकांना निवेदन देऊन विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, अशी मागणी केली होती.

दरम्यान, याप्रकरणी युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदिप सावंत, शशिकात झोरे, शीतल शेठ-देवरुखकर यांनी विभागीय शिक्षण कार्यालयाकडे पाठपुरावा करुन व्द्यिार्थ्यांना त्वरित दुसर्‍या मान्यताप्राप्त महाविद्यालयामार्फत १२ चे अर्ज भरणे तसेच मुदत वाढवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर गुरुवारी या संदर्भात विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राव कॉलेजचे संचालक विनय पांडे सर यांची भेट घेत हा प्रश्न निकाली काढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -