घरताज्या घडामोडीसिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित होणार; सदस्यीय समितीची स्थापना

सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित होणार; सदस्यीय समितीची स्थापना

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागाने राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी आरोग्य विभागाने राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमली आहे. सात दिवसात ही समिती अहवाल सादर करेल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली.

आरोग्य विभागाने याआधी कोरोना आणि इतर रुग्णांच्या तपासणीसाठी खासगी रुग्णालयांनी दर तसेच खासगी प्रयोगशाळांनी आरटीपीसीआर, रॅपीड ॲण्टी जेन, ॲण्टीबॉडी चाचण्यांसाठीचे दर निश्चित केले आहेत. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी सिटीस्कॅन सारख्या चाचणीची देखील आवश्यकता भासते. त्यासाठी खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन सुविधा असलेल्या केंद्रांकडून अवाजवी रक्कम आकारण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासाठी एचआरसीटी चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

डॉ.शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत एलटी वैद्यकीय महाविद्यालय आणि सायन रुग्णालयाच्या रेडीऑलॉजी विभाग प्रमुख डॉ. अनघा जोशी, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता हे सदस्य असून संचालक आरोग्य समितीचे सदस्य सचिव आहेत. ही समिती एचआरसीटी चाचणीच्या दर निश्चितीसाठी खासगी रुग्णालये आणि एचआरसीटी चाचणी केंद्रांशी चर्चा करुन सात दिवसात शासनाला अहवाल सादर करतील, असे टोपे यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – दिलासादायक! कोरोनावर मात करून बरे झालेल्या रूग्णांमध्ये भारत प्रथम स्थानी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -