घरमुंबईअंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी 'कमोड व्हिलचेअर'!

अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी ‘कमोड व्हिलचेअर’!

Subscribe

अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी पालिकेच्या तिन्ही मोठ्या रुग्णालयांमध्ये 'कमोड व्हिलचेअर'ची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

अनेकदा दुखापतीमुळे किंवा वयोमानामुळे अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींची सर्वच कामे ही त्या कुटुंबियांना करावी लागतात. विशेषत: लकवा गेलेल्या व्यक्तींना जोपर्यंत त्यांची पूर्णपणे ट्रिटमेंट होत नाही तोपर्यंत एका जागेहून उठता – बसता येत नाही. अशा रुग्णांच्या दैनंदिन कृती ही अंथरुणातच होतात. तसंच, असे रुग्ण संपूर्णपणे परावलंबी होतात. शिवाय, एकदा का रुग्णालयात असे रुग्ण दाखल झाले तर अनेकदा त्यांचे नातेवाईकही त्यांना रुग्णालयातच अनेक वर्षांसाठी खितपत सोडून जातात. याच पार्श्वभूमीवर, अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांसाठी पालिकेच्या तिन्ही मोठ्या रुग्णालयांमध्ये ‘कमोड व्हिलचेअर’ची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

एकूण ६५ व्हिलचेअर्स देणार

पालिकेच्या केईएम, सायन, नायर या रुग्णालयांमध्ये आणि मॅटर्निटी होम्समध्ये ही सुविधा सध्या प्रायोगिक तत्वावर देण्यात आली आहे. प्रत्येकी २० आणि मॅटर्निटी होम्समध्ये ५ अशा एकूण ६५ कमोड व्हिलचेअर्स पालिकेच्या रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. याचा फायदा अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

एजन्सीकडून या व्हिलचेअर्स मोफत

एनएचएम म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत या व्हिलचेअर्स पालिकेच्या रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. तर, एमएसआयएनएस म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटीव्ह स्किमअंतर्गत एका एजन्सीकडून या व्हिलचेअर्स मोफत देण्यात आल्या आहेत. या चेअर्सचा वापर जिथे चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो त्याठिकाणी या चेअर्स द्यायच्या असं ठरवलं होतं. त्यानुसार, पालिका रुग्णालयात त्या देण्यात आल्या असल्याचं पालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितलं.

अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींसाठी शिवाय, जे किमान उठून बसू शकतील. पण, जे पायांवर फिरु शकत नाहीत अशा रुग्णांना या व्हिलचेअर्स देण्यात येणार आहेत. सध्या प्रायोगिक तत्वावर या चेअर्स मोफत मिळाल्या आहेत. जर या चेअर्सचा योग्य पद्धतीने पालिका रुग्णालयांमध्ये वापर झाला तर या चेअर्सची आम्ही देखील ऑर्डर देऊन रुग्णांसाठी उपलब्ध करुन देऊ. रुग्णांनाही ही सुविधा मोफत देण्यात येणार आहे.
– डॉ. पद्मजा केसकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी, पालिका

- Advertisement -

तर, याविषयी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितलं की, ” दोन दिवसांपूर्वीच या व्हिलचेअर्स रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. जे रुग्ण स्वत: हून फिरु शकत नाही अशा रुग्णांसाठी ही सुविधा दिली जाणार आहे. काही दिवसानंतर या चेअर्सचं वाटप केलं जाणार आहे.”

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -