घरमनोरंजनहत्येप्रकरणी आदित्य पांचोली विरोधात तक्रार दाखल

हत्येप्रकरणी आदित्य पांचोली विरोधात तक्रार दाखल

Subscribe

अभिनेता आदित्य पांचोली यांनी एका मॅकेनिकला ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणाी अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार दुरुस्तीचे पैसे मागितल्याने त्या दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीला ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही धमकी अभिनेता आदित्य पांचोली यांनी दिल्याची तक्रार वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. याप्रकरणी अभिनेता आदित्य पांचोली विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

अभिनेता आदित्य पांचोली यांची कार बिघडली होती. ही कार दुरुस्ती करण्यासाठी आदित्य पांचोलीने मॅकेनिककडे दुरुस्तीसाठी दिली होती. त्या कार दुरुस्तीचे बिल २ लाख ८२ हजार १५८ रुपये झाले होते. या बिलाचे पैसे मागितल्यानंतर आदित्य पांचोलीने मॅकेनिकला ठार मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मॅकेनिकलने पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्वप्रकार पोलिसांना सांगितला. मॅकेनिकलच्या सांगण्यावरुन पोलिसांनी अभिनेता आदित्य पांचोली विरोधात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -