सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्डविरोधात तक्रार दाखल

सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्डने मारहाण केल्याचा आरोप करत एका व्यक्तीने मुंबईतल्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Mumbai
complaint filed against salman khan
सलमान खानच्या विरोधात तक्रार दाखल

बॉलिवूडचा सुलतान सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्डविरोधात पोलिसाता तक्रार दाखल करण्यात आली आहे. सलमान खान आणि त्याच्या बॉडीगार्डने मारहाण केल्याचा आरोप करत एका व्यक्तीने मुंबईतल्या डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सलमान खान डी. एन. नगर भागामध्ये सायकल चालवत होता. त्यावेळी तक्रार करणारा व्यक्ती त्याचा व्हिडिओ काढत होता. त्यामुळे राग आलेल्या सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डने मारहाण केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

डी. एन. नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान बुधवारी संध्याकाळी डी. एन नगर परिसरामध्ये सायकल चालवत होता. त्यावेळी एका कारमधून जाणारा तक्रारदार सलमानचा व्हिडिओ काढत होता. जवळपास २० मिनिटं तो सलमान खानचा व्हिडिओ शूट करत होता. त्यामुळे संतापलेल्या सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डने त्याच्या हातातला मोबाईल हिस्कावून त्याला मारहाण केली, असे तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here