कंगणा राणावतविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहिण रंगोलीविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतल्या पाली हिलमध्ये विकत घेतलेल्या बंगल्याचे ब्रोकरेज न भरल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी कंगणाला समन्स बजावला आहे.

MUMBAI
bollywood Actress Kangana Ranaut
बॉलिवूडची क्विन कंगणा राणावत

बॉलिवूडची क्विन कंगणा राणावतविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकाश रोहिरा यांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुंबईतल्या पाली हिलमध्ये विकत घेतलेल्या बंगल्याचे ब्रोकरेज न भरल्याने कंगणा आणि तिच्या बहिणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी कंगणा रानावतला समन्स पाठवण्यात आला आहे.

मागच्या वर्षी कंगणा राणावत आणि तिची बहिण रंगोली यांनी पाली हिलमध्ये २० कोटीचा बंगला विकत घेतला होता. या दोघींवर बंगला विकत घेताना ब्रोकरला संपूर्ण रक्कम न दिल्याचा आरोप आहे. मात्र कंगणा राणावतने हा आरोप फेटाळून लावला आहे. तिच्या फायनान्स टीमने एक टक्का कमिशन म्हणजेच २० लाख रुपये या ब्रोकरला दिले. मात्र आता तक्रारदार ब्रोकरने आणखी २ टक्के कमिशनची मागणी केली असल्याचे कंगणाने स्पष्ट केले आहे.