घरमुंबईएसटी वाहकांविरूद्धच्या तक्रारी वाढल्या

एसटी वाहकांविरूद्धच्या तक्रारी वाढल्या

Subscribe

वाहक-प्रवासी समन्वयाच्या प्रशिक्षणाकडे महामंडळाचे दुर्लक्ष

एसटीचे वाहक आणि प्रवाशांतील होणार्‍या वादात वाढ झाली असून एसटीच्या वाहकांविरूद्धच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या तक्रारींमध्ये सर्वात जास्त तक्रारी प्रवाशांबरोबर गैरवर्तवणूक केल्याच्या आहेत. वाहकांना प्रवाशांबरोबर समन्वय साधने आणि कसे वागले पाहिजे, याबद्दल प्रशिक्षण देणे गरजेचे आहेत. मात्र, आज या प्रशिक्षणाविना एसटी महामंडळात ३६ हजार वाहक काम करत आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये छोट्याशा कारणावरून देखील वाद वाढले आहेत.

सध्या एसटी महामंडळामध्ये १ लाखापेक्षा जास्त कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहे. यात एसटी ३६ हजार वाहक असून त्यात ४५०० महिला वाहकांचा देखील समावेश आहे. एसटी महामंडळाकडून प्रशासकीय अधिकारी, मेकॅनिकल- इंजिनियर आणि चालक यांना एसटी मंडळाकडून प्रशिक्षण दिले जाते. मात्र, ज्या वाहकांचा ७० लाख प्रवाशांबरोबर संपर्क येतो त्यांना प्रवाशांसोबत कशा प्रकारे समन्वय साधायचा याचे प्रशिक्षण दिले जात नाही. प्रत्येक महिन्यात आलेल्या तक्रारींमध्ये ६० टक्के तक्रारी वाहकांच्या गैरवर्तवणुकीबद्दल आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या एक वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहेत. याबद्दल, एसटी वाहकांना प्रवाशांशी कसे वागायचे याचे प्रशिक्षण देण्याची सूचना अधिकार्‍यांनी केली होती. मात्र, याची एसटी महामंडळांने दखल घेतली जात नाही,अशी माहिती या अधिकार्‍याने दिली.

- Advertisement -
७० वर्षांत एकदाही प्रशिक्षण नाही

आज दररोज राज्यभरात एसटीने प्रवास करण्याची संख्या ७० लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र, या प्रवाशांना उत्तम सुविधा आणि समन्यव साधण्यासाठी एसटी महामंडळाच्या वाहकांसाठी एकही प्रशिक्षण वर्ग घेण्यात आलेला नाही. त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा एसटी प्रशासनाने केलेला नाही.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -