घरमुंबईखेडमधील आरोग्य केंद्रांची दैन्यावस्था

खेडमधील आरोग्य केंद्रांची दैन्यावस्था

Subscribe

आरोग्य विभागाच्या बैठकीत तक्रारींचा पाऊस

पुणे जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रे डिजिटल केली जाणार आहेत. या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी खेड तालुक्यात आरोग्य विभागाचा ८ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत सांगितले. मात्र त्याच बैठकीत सदस्यांनी तालुक्यातील आरोग्य केंद्रांची कशी दयनीय अवस्था झाली आहे, याचा पाढाच वाचला. त्यामुळे या बैठकीत आरोग्य विभागाचा विरोधाभास समोर आला.

खेड तालुका आरोग्य विभाग व बांधकाम विभागाची आढावा बैठक बुधवारी खेड पंचायत समितीमध्ये पार पडली. त्यावेळी डॉ. दिलीप माने बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने, उत्तर पुणे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मैथिली झांजुरणे, सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती अमोल पवार, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख आदी उपस्थित होते.

- Advertisement -

स्लॅब कोसळण्याची भीती
सदस्या तनुजा घनवट म्हणाल्या की, वाडा आरोग्य केंद्रात डॉक्टर नाहीत. रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार सांगूनही तालुका वैद्यकीय अधिकारी येथे लक्ष देत नाहीत. बाबाजी काळे म्हणाले की, राजगुरुनगर आरोग्य केंद्राची इमारत नादुरुस्त झाली आहे ती जीर्ण झाल्याने या पावसाळ्यात स्लॅब कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे रुग्णांना धोका निर्माण झाला आहे. ही इमारत दुरुस्त न केल्यास दवाखाना दुसरीकडे सुरक्षितस्थळी हलवावा, अशी मागणी केली.

पश्चिम भागातील आरोग्य केंद्रात निवासी मेडिकल ऑफिसर असावा. आदिवासी भागातील आरोग्य केंद्राचे डॉक्टर तेथे राहत नाहीत. आम्ही अनेकदा मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आंबोली आरोग्य केंद्रात डॉक्टर नाही. कुडा आरोग्य केंद्रातील निवासस्थान दुरुस्ती करण्यात यावे, असे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी सांगितले.

- Advertisement -

– प्रवीण माने, सभापती, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, पुणे
आशा वर्कर तालुक्यात उत्तम आरोग्याचे काम करीत आहेत. त्यांना मिळणारा मोबदला अत्यल्प आहे. त्यांना किमान वेतन मिळाले पाहिजे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाणार आहे. जिल्ह्यातील जनतेला आरोग्याची शाश्वत सेवा कशी देता येईल याकडे कटाक्षाने पाहिले जात आहे. कामात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -