घरमुंबईआचारसंहिच्या काळात तब्बल ५४० कोटी रुपये मालमत्तेची जप्ती

आचारसंहिच्या काळात तब्बल ५४० कोटी रुपये मालमत्तेची जप्ती

Subscribe

देशभरात विविध अंमलबजावणी संस्थांकडून २५ मार्च २०१९ पर्यंत सुमारे ५४० कोटी रुपये मूल्याची एकूण जप्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर २५ मार्च पर्यंतच्या जप्तीचा अहवाल समोर आला आहे. देशभरात विविध अंमलबजावणी संस्थांकडून २५ मार्च २०१९ पर्यंत सुमारे ५४० कोटी रुपये मूल्याची एकूण जप्ती करण्यात आली आहे. यामध्ये रोकड, मद्य, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू आणि इतर भेट वस्तूंचा समावेश आहे. सर्वाधिक मूल्याची जप्ती तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यातून झाली आहे. आंध्र प्रदेशात १०३.४ कोटी रुपये मूल्याची, तामिळनाडूत १०७.२४ कोटी रुपये मूल्याची, तर उत्तर प्रदेशातून १०४.५३ कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण १९.११ कोटी रुपये मूल्याची जप्ती झाली आहे. यात रोकड ५.९० कोटी रुपये, ९.७१ कोटी रुपये मूल्याचे १२.०३ लाख लिटर मद्य, ३.११ कोटी रुपये मूल्याचे ३६.६ किलो अंमली पदार्थ, ४८ लाख रुपये किंमतीचे मौल्यवान धातू यांचा समावेश आहे.

विविध प्रकारे मूल्याचा वापर 

एकूण रोकड जप्त – १४३.४७ कोटी रुपये
एकूण मद्य जप्त – ८९.६४ कोटी रुपये मूल्याचे
एकूण अंमली पदार्थ जप्त – १३१.७५ कोटी रुपये मूल्याचे
एकूण मौल्यवान धातू (सोने, इत्यादी) जप्त – १६२.९३ कोटी रुपये मूल्याचे
एकूण भेट वस्तू जप्त – १२.२०२ कोटी रुपये मूल्याचे

- Advertisement -

हेही वाचा –

हे आहेत लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ४० स्टार प्रचारक

राजेंद्र गावितांचा शिवसेनेत प्रवेश; पालघरमधून दिली उमेदवारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -