घरमुंबईमतदार याद्यांमध्ये गोंधळ कायम दुबार यादी, नावांमध्ये त्रुटी

मतदार याद्यांमध्ये गोंधळ कायम दुबार यादी, नावांमध्ये त्रुटी

Subscribe

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असता उमेदवार प्रचार यंत्रणेची रणनीती आखण्यात व्यग्र झाले आहेत. त्याचवेळी मतदारांच्या मतदार यंत्रणेतील गदारोळाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाल्याने मतदार याद्यांमधील घोळ चव्हाट्यावर आला आहे. यादींमध्ये छापील नावात अनेक त्रुटी असल्याने मतदारांना स्वत:चे नाव ओळखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. तर व्यक्तीची व दुबार नोंदणी असलेली नावे वगळण्याचे अर्ज प्राप्त होऊनही ती वगळली जात नसल्याने यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

लवकरच विधानसभा व महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मतदानासाठी सज्ज होण्याची तयारी मतदारांकडून सुरू आहे. तर निवडणूक विभागाकडून देखील नव्या मतदार नोंदणीसाठी आवाहन केले जात आहे. मात्र, वर्षानुवर्षे मतदार याद्यांमध्ये होत असलेल्या चुकांचा फटका नव्या तसेच जुन्या मतदारांना बसत आहे. मतदार याद्यांमधील नावासह पत्त्यामध्ये अनेक त्रुटी आढळत असून त्या सुधारण्यासाठी मतदारांकडून निवडणूक विभागाकडे तक्रार अर्जांचा पाऊस पाडला जात आहे. त्यानंतरही यादींमधील त्रुटी सुधारण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. ऑनलाईन अर्ज व कागदपत्रे अपलोड केल्यानंतरही तीच कागदपत्रे प्रत्यक्षात जमा करण्यासाठी निवडणूक विभागाच्या कार्यालयात बोलवले जात आहे. परंतु एकदा कागदपत्रे जमा करूनही अर्जाची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने नागरिकांची नाव नोंदणीसह दुरुस्तीसाठी पायपीट होतच आहे. यानंतरही एखाद्याच्या नावाची नोंदणी झाल्यास छापील यादीतील त्रुटींमुळे त्यांना स्वत:चे नाव ओळखण्यासाठी कौशल्य पणाला लावावे लागत आहे. काही कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या यादीत विभागली गेली आहेत. यामुळे त्यांचे मतदानाचे केंद्रही बदलले गेले आहेत. मात्र, अर्ज भरून देताना त्यामध्ये रहिवासी सोसायटीचे नाव व पत्ता योग्यरीत्या लिहिलेला असतानाही, नाव नोंदणीवेळी मतदार यादीत तो बदलतो कसा, असा प्रश्न मतदारांना वर्षानुवर्षे पडत आहे. ओळखपत्रातील चुकांमुळे त्याचा वापर करताना समस्या अधिक वाढवण्यासारखे ठरत आहे.

- Advertisement -

मतदारांकडून अर्ज भरताना पुरेपूर खबरदारी घेतली जात असतानाही मतदानयादीत नावाचा समावेश होताना त्यांचे पत्ते बदलल्याचा प्रकार पाहायला मिळतो. या मागच्या नेमक्या कारणांबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, अशा त्रुटींमुळे एकाच कुटुंबातील व्यक्ती कागदोपत्री विभागली जात असून, शासकीय प्रक्रिये वेळी संबंधिताला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.नेरुळ येथील सिद्धेश्वर तुकाराम वरपे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. यानुसार मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्याचे अनेक अर्ज त्यांच्या नातेवाइकांनी केले आहेत. त्यानंतरही वर्षानुवर्षे याद्या अद्ययावत होत असतानाही त्यासोबत मृत्यू झालेल्या व्यक्तींनाही मतदार यादीत जिवंत ठेवण्याचे काम संबंधित यंत्रणेकडून होत आहे. मतदारयादीत नावनोंदणीसाठी प्रत्यक्ष अर्ज करूनही अनेकदा नागरिकांना अपयश येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -