पवार इन अॅक्शन; कॉंग्रेसचे बडे नेते आणि राऊतही पवारांच्या भेटीला

भाजप - शिवसेनेच्या वादानंतर आला राजकारणाला वेगळे वळण आले आहे.

Mumbai
congress big leaders meet ncp leader sharad pawar

सध्या राज्यात सत्ता शिवसेनेची येणार की भाजपची? मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिवसेनेचा? याचीच सगळ्यात जास्त चर्चा असताना आता शेवटच्या क्षणी आणखी एक ट्विस्ट आला आहे. हा ट्विस्ट वाढला आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार इन अॅक्शनमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. शरद पवार यांच्या भेटीकरता कॉंग्रेसचे बडे नेते ‘सिल्व्हर ओक’ या पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत देखील पवारांच्या पुन्हा एकदा भेटीला गेले आहेत. त्यामुळे आता राजकारणाला एक वेगळे वळण आले असून कॉंग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत पवार यांची आघाडीबाबत बैठक सुरु असून शिवसेनेचे नेते संजय राऊतही या बैठकीला उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर आरोप केल्यानंतर हे सर्व आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोडू काढले आहे. त्यामुळे राजकारणाच्या घडामोडीला एक वेगळे वळण आले आहे, त्यामुळे आता राज्यात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे नेते गेले पवारांच्या भेटीला

भाजप – शिवसेनेने एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप केल्यानंतर शरद पवारांच्या भेटीस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे आणि माणिकराव इतर बडे नेते पवारांच्या भेटीस गेले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत देखील पवारांच्या पुन्हा एकदा भेटीला गेले आहेत. त्यामुळे ही भेट भाजपाला धक्का देणारी असणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपची प्रत्यक्ष कृती पाहावी लागेल

२४ ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. मात्र, अद्याप सरकार स्थापन केले गेले नाही. सतत भाजप – शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरुन संघर्ष पहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या महायुतीमध्ये वादविवाद झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता भाजपची प्रत्यक्ष कृती काय असणार हे पाहावे लागणार आहे.  अशोक चव्हाण; महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री


हेही वाचा – खोटारड्यांशी चर्चा नाही; मुख्यमंत्री शिवसेनेचाच – उद्धव ठाकरे