घरमुंबईडोंबिवलीतील काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

डोंबिवलीतील काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

Subscribe

येथील सिमेंट-काँक्रीटीकरणाचे काम आमदार निधीतून होणार असल्याने राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे उपस्थित होते, असे स्पष्टीकरण देत नगरसेवक नंदू म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाबाबतचा प्रस्ताव फेटाळला आहे.

डोंबिवली पश्चिमेतील काँग्रेसचे नगरसेवक नंदू म्हात्रे आणि नगरसेविका हर्षदा म्हात्रे यांच्या प्रभागातील विकास कामांचे भूमीपुजन बुधवारी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. काँग्रेसचा कोणताही पदाधिकारी या भूमीपुजन सोहळ्याला उपस्थित नव्हता. त्यामुळे काँग्रेसचे हे दोन्ही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. मागील काही महिन्यांपासून राज्यातील प्रमुख राजकारण्यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी घेत आहेत. पण नगरसेवक नंदू म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळले आहे.

हेही वाचा – गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बुजवल्यास केडीएमसीला ‘खड्डे रत्न’ पुरस्काराने गौरवणार

नंदू म्हात्रे यांनी पक्षांतराचे वृत्त फेटाळले

विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याने सध्या काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजप शिवसेनेत जाण्यासाठी चढाओढ रंगल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर केडीएमसीच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेकजण पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याचेही समजते. डोंबिवली पश्चिम येथील काँग्रेसचे नगरसेवक नंदू म्हात्रे यांच्या प्रभागात आमदार निधीतून गावदेवी सोसायटी ते गायकवाड वाडीपर्यंतच्या रस्ते काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच डोंबिवली पश्चिमेतील नगरसेविका हर्षदा हृदयनाथ भोईर यांच्या प्रभागातही आमदार निधीतून डॉन बॉस्को स्कूल जयहिंद कॉलनी येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या दोन्ही कामांचे भूमीपुजन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात नगरसेवक नंदू म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळले असून आमचे घराणे हे पूर्वीपासून काँग्रेसवासीय आहे. त्यामुळे भाजप प्रवेशाची अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम आमदार निधीतून होणार असल्याने डोंबिवलीचे आमदार म्हणून त्यांच्या हस्ते करण्यात आले असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -