घरमुंबईकाँग्रेसच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Subscribe

काँग्रेसच्या शिष्ठमंडळाची नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत पूरग्रस्त भागातील जनजीवन सुरळीत व्हावे, यासाठी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे अनेक मागण्या केल्या.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात कित्येक घरे उद्धवस्त झाले आहेत. त्याचबरोबर गुरे-ढोरे देखील वाहून गेले आहेत. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या शिष्ठ मंडळाची मुख्यमंत्रीसोबत बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसने पूरग्रस्त नागरिकांना आधार देता यावा यासाठी काँग्रेसने अनेक मागण्या केल्या आहेत. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, आ. बसवराज पाटील, माजी मंत्री नसीम खान, कृपाशंकर सिंह, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे, प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले, आ. विरेंद्र जगताप, आ. हुस्नबानो खलिफे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस पृथ्वीराज साठे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – ठाण्यात काँग्रेसकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट रवींद्र आंग्रे मैदानात?

काँग्रेसच्या शिष्ठमंडळाने काय मागण्या मागितल्या?

  • पूरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. पशुधन नष्ट झाले आहे. लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई द्यावी.
  • शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे
  • शेतकऱ्यांना नविन कर्ज उपलब्ध करून द्यावे.
  • शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ६० हजार रूपये मदत द्यावी.
  • बाजार भावाप्रमाणे पशुधनाच्या नुकसानीची भरपाई द्यावी.
  • पडझड झालेली घरे सरकारने बांधून द्यावीत.

या सर्व मागण्यांचे निवेदन काँग्रेसच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

- Advertisement -


हेही वाचा – काँग्रेसची आता सेक्टर प्रमुख ट्रेनिंगला सुरुवात…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -