घरलोकसभा २०१९तडका वादाचाVideo: मतदान केंद्रातील टेबलवर काँग्रेसची जाहिरात; भाजपचा आक्षेप

Video: मतदान केंद्रातील टेबलवर काँग्रेसची जाहिरात; भाजपचा आक्षेप

Subscribe

मतदान केंद्रावरील टेबलवरील दर्शनी भागात काँग्रेसची जाहिरात असलेले वृत्तपत्र लावण्याचा प्रकार डोंबिवलीत घडल्याने, भाजपने यावर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात भाजपने निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात झोनल अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

डोंबिवली पश्चिम येथे एका मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांनी टेबलावर काँग्रेसची जाहिरात असलेले वर्तमानपत्र लावले होते. त्यामुळे भाजप पक्षाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रभूघाटे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. Pradnyesh Prabhughate

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 29, 2019

- Advertisement -

 

डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी शाळेतील बूथ क्रमांक १८८ मधील मतदान केंद्रावरील एका टेबलवर हा प्रकार घडला. भाजपचे डोंबिवली पश्चिम अध्यक्ष प्रज्ञेश प्रभूघाटे यांच्या निदर्शनास ही बाब लक्षात येताच त्यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. मुद्दामूनच हे पेपर लावण्यात आल्याचा आरोप करीत त्यांनी निवडणूक अधिका-यांना फैलाव घेत जाब विचारला याप्रकरणी घाटे यांनी संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची झोनल अधिकारी शैलेश मळेकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -