घरताज्या घडामोडीमातोश्री २ खरेदी व्यवहाराची चौकशी करा; काँग्रेस नेते संजय निरुपम यांची मागणी

मातोश्री २ खरेदी व्यवहाराची चौकशी करा; काँग्रेस नेते संजय निरुपम यांची मागणी

Subscribe

काँग्रेसमध्ये सध्या अडगळीत पडलेले माजी खासदार संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २०१६ मध्ये उद्धव ठाकरे यांनी आता ते राहत असलेल्या मातोश्री निवासस्थाना समोरच १० हजार स्केवर फुटाची जमीन विकत घेऊन त्यावर मातोश्री २ चे बांधकाम करायला सुरुवात केली होती. मात्र हा खरेदी व्यवहार संशयास्पद असून त्यामध्ये रोखीने व्यवहार झाला असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला असून या व्यवहारामध्ये ईडी लक्ष घालावे, अशी मागणीच त्यांनी केली आहे.

संजय निरुपम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा आरोप केला आहे. तसेच आरोपसंबंधी काही मुद्दे देखील उपस्थित केले आहेत. २०१६ साली ठाकरेंनी राजभूषण दिक्षीत यांच्याकडून ही जमिन विकत घेतली होती. राजभूषण दिक्षीत यांच्यावर मनी लॉड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांची सध्या चौकशीही देखील सुरु आहे. अशा आरोपीने ठाकरेंना वांद्रे येथील मोक्याच्या ठिकाणची जागा केवळ ५.८ कोटीला विकली. बाराभावाप्रमाणे पाहीले गेले तर या जागेची किंमत खूप अधिक असल्याचे निरुपम यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

मातोश्री २ च्या जमिनीचा व्यवहार रोखीने देखील झाला असावा, असा संशय निरुपम यांनी व्यक्त केला आहे. याचा तपास ईडीने करायला हवा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

 

निरुपम यांच्या आरोपानंतर शिवसेनेने मात्र या आरोपांना किंमत दिलेली नाही. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय आहेत याची माहिती महाराष्ट्राला आहे. त्यामुळे निरुपम यांना गंभीरतेने घेण्याची गरज नसल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात येत आहे”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -