घरमुंबईस्वकीयांनीच माझ्याविरोधात षडयंत्र रचले - विजय वडेट्टीवार

स्वकीयांनीच माझ्याविरोधात षडयंत्र रचले – विजय वडेट्टीवार

Subscribe

प्रदेशाध्यक्षपदी नाव चर्चेत येताच बदनामी विजय वडेट्टीवार यांचे स्वापक्षियांकडे बोट

प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी आपले नाव चर्चेत येताच काहींनी पद्धतशीर आपल्या बदनामीचा कट योजण्यात आला. आपला पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची हाकाटी पिटण्यात आली, असा गंभीर आरोप करत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वपक्षीयांकडे बोट दाखवले. राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्याकडे येण्याची शक्यता दिसू लागल्यापासून काहींनी आपल्याविरोधात षडयंत्र रचले होते अशी खळबळजनक माहिती त्यांनी दिली. याही परिस्थितीत पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारण्याची आपली तयारी असल्याचे ते म्हणाले. पासपोर्ट प्रकरण उकरुन काढणे म्हणजे केवळ आपल्याला राजकाणातून उठवण्याचा प्रकार होता असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान वडेट्टीवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. वडेट्टीवार यांच्या विरोधात माजी आमदार मितेश भंगाडिया यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. मंत्री वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप आहे, अशी भाजपचे माजी आमदार असलेले भांगडिया यांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणाऱ्या क्रिमिनल केसेस लपवल्या असल्याचा आरोप केला होता. भांगडिया यांनी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट कार्यालयापर्यंत तक्रार केली होती. तरीही कारवाई झाली नाही. अखेर त्यांनी उच्च न्यायालयात गाव घेतली. विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोराचा पत्ता  दिला होता. तिथल्या पोलीस स्टेशनमधून एनओसी घेतली होती. त्यात त्यांच्यावर कुठेही केसेस सुरू नाहीत, असे म्हटले होते.  हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -