घरमुंबईकॉंग्रेसची श्रद्धा औरंगजेबापेक्षा संभाजी महाराजांवर अधिक असायला हवी - संजय राऊत

कॉंग्रेसची श्रद्धा औरंगजेबापेक्षा संभाजी महाराजांवर अधिक असायला हवी – संजय राऊत

Subscribe

पाच वर्षे तुमची केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्ता होती. तुम्ही काय केले पाच वर्षात ? अलाहाबादचे प्रयागराज असे नाव बदलले, फैजाबादचे अयोध्या केले, त्याचवेळी औरंगाबादचे संभाजीनगर करता आले असते. तुमची भाजपची महाराष्ट्रात सत्ता असताना तुम्हालाही हे नामकरण कागदोपत्री करता आले असते, तेव्हा का नाही केले असा सवाल सामनाचे खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. तर कॉंग्रेसलाही सुनावत त्यांनी स्पष्ट केले की कॉंग्रेसची श्रद्धाही औरंगजेबापेक्षा संभाजी महाराजांवर अधिक असायला हवी. अयोध्येत राम मंदिरासाठीही कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी परवानगी दिली होती. त्यामुळेच भारतीयांना औरंगजेब आणि बाबरही महत्वाचा नसल्याचे त्यांनी यावेळी सुनावले. औरंगाबादच्या नामकरणावरून सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी शिवसेनेची भूमिकाही यावेळी स्पष्ट केली.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण हे ३० वर्षांपूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. पण हे नाव कागदोपत्री करण्यात आले नाही, ते नजीकच्या काळात कागदोपत्रीही करण्यात येईल. महाविकास आघाडीत या नामांतराच्या मुद्द्यावर कोणताही मतभेद नाही. चर्चेच्या माध्यमातून हा विषय सुटू शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. नामांतराच्या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका ही कायम राहणार आहे, त्यामध्ये बदल होणार नाही असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

सामनाच्या अग्रलेखाच्या भाषेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे. हे पत्र त्यांनी ताबडतोब लिहावे असे त्यांनी स्पष्ट केले. मला चंद्रकांत दादांची भीती वाटते, ते पत्र लगेच लिहावे असेही मिश्किलपणे राऊत म्हणाले. चंद्रकांतदादा सामना वाचू लागले ही मोठी गोष्ट आहे. सामना वाचला तर त्यांच्या जीवनात बदल होईल. तसेच सामना वाचत राहिले तर त्यांना विश्वास होईल की हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -