राफेल घोटाळयाविरोधात मुंबईत काँग्रेसचा मोर्चा!

राफेल विमान घोटाळ्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस २७ सप्टेंबरला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत राफेल कराराविषयी मोदी खोटं बोलतात असल्याचा आरोप केला होता.

Mumbai
राफेल विरोधात काँग्रेसचा मुंबईमध्ये मोर्चा (फाईल फोटो)

राफेल विमान खरेदी घोटाळा हा देशातील सर्वात मोठा असल्याचा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यापाठोपाठ आता फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रँकोइस होलँद यांनी नुकतंच राफेल घोटाळ्याप्रकरणी एक मोठं वक्तव्य केलं आहे. फ्रँकोइस होलँद यांच्या म्हणण्यानुसार, ”राफेल खरेदी व्यवहार उद्योगपती अनिल अंबानी यांच्यामार्फत करावा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. तसंच राफेल व्यवहारामुळे अनिल अंबानींच्या कंपनीला ४१ हजार कोटी रुपयांचा फायदा झाल आहे. दरम्यान याप्रकरणी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा”. याच राफेल विमान घोटाळ्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस २७ सप्टेंबरला मुंबईत मोर्चा काढणार आहे. राहुल गांधी यांनी लोकसभेत राफेल कराराविषयी मोदी खोटं बोलतात असल्याचा आरोप केला होता. दरम्यान राफेल घोटाळ्याविरोधात भाजप सरकारमधील अन्य काही मुद्द्यांवरही काँग्रेसने निशाणा साधला असून, मोर्चादरम्यान या मुद्द्यांवरुनही भाजप सरकारविरोधात निषेध व्यक्त केला जाणार आहे.


वाचा : राफेलचे दर आणि काळा पैसा वाढला कसा – कन्हैया कुमार

काँग्रेसने भाजपवर लावले ‘हे’ आरोप

सर्जीकल स्ट्राईक दिन साजरा करुन सैनिकांच्या शौर्याचं राजकारण केलं जातंय.सर्जिकल दिवस साजरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकाच्या बलिदानाचा वापर राजकीय फायदयासाठी करत आहेत. हा देशातल्या सीमांवर लढणा-या जवांनाचा अवमान आहे.

कल्याण डोंबिवली स्टेशन अस्वच्छतेबद्दल रेल्वे डिआरेमुळे रियालिटी चेक केलं गेलं. मात्र, त्याठिकाणी अजूनही खूप दुर्गंधी आहे. त्यामुळे मोदींचे स्वछ भारत अभियान फसले आहे.

उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे निदनिय आहे.उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफी मागावी.