घरमुंबईगो बॅक टोरेंट - काँग्रेसचे रस्त्यावर झोपून रास्तारोको आंदोलन

गो बॅक टोरेंट – काँग्रेसचे रस्त्यावर झोपून रास्तारोको आंदोलन

Subscribe

वीज वितरण व्यवस्थेचे होत असलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात सर्वपक्षीय नेते पुन्हा एकवटले असतानाच ठाणे काँग्रेसच्या वतीने टोरेंट कंपनीच्या विरोधात जोरदार आज आंदोलन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून टोरेंट कंपनीचा निषेध केला.

कळवा, मुंब्रा, दिवा परिसरात वीज वितरण व्यवस्थेचे होत असलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात सर्वपक्षीय नेते पुन्हा एकवटले असतानाच ठाणे काँग्रेसच्या वतीने टोरेंट कंपनीच्या विरोधात जोरदार आज आंदोलन केले. गो बॅक टोरेंट अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर झोपून टोरेंट कंपनीचा निषेध केला. ज्या टोरेंट पॉवर कंपनीला हे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तो निर्णय रद्द करण्याची घोषणा चार दिवसात शासनाने न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखो नागरिकांचा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांचा असंतोष

अचानक खाजगीकरण होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. टोरेंट पॉवर कंपनीचा भिवंडी येथील महावितरणच्या कामाचा अनुभव चांगला नसून भिवंडी परिसरामध्ये टोरेंट पॉवर कंपनी विरोधात नागरिकांचा प्रचंड असंतोष आहे. दरम्यान येत्या १९ जानेवारीला कळवा, मुंब्रा, दिवा परिसर बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेते मंडळींनी दिला होता. दरम्यान मुंब्रा परिसरात ठाणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले असुन चक्क रस्त्यावर झोपून टोरेंट या कंपनीच्या विरोधात आंदोलन केले. दरम्यान या खासगीकरयात मोठा भरस्ताचार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला असून त्वरित हे खासगीकरण रोखा नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -