घरमुंबईकाँग्रेसची आता सेक्टर प्रमुख ट्रेनिंगला सुरुवात...

काँग्रेसची आता सेक्टर प्रमुख ट्रेनिंगला सुरुवात…

Subscribe

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर डोबिंवलीत बूथपातळीवर काँग्रेसने सेक्टर प्रमुख ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. पक्षाच्या बांधणीकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

बूथपातळीपासून काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सेक्टर प्रमुख संकल्पना राबवीत डोंबिवलीत ट्रेनिंग देण्यासाठी सुरुवात केली आहे. सोमवारी प्रदेश सचिव संतोष केणे यांच्याकडून डोंबिवलीतील सेक्टर प्रमुखांना ट्रेनिंग देण्यात आली. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या बांधणीकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

डोंबिवली विधानसभा आणि कल्याण ग्रामीण विधानसभा या दोन विधानसभाची जबाबदारी केणे यांनी घेतली असून, तिथल्या सेक्टर प्रमुखांना ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात बूथ पातळीपासून काँग्रेसने सुरुवात केली आहे. एका बूथ पातळीवर ५ समन्वयक नेमण्यात येत आहे. त्यातील एक जण हा सेक्टर प्रमुख म्हणून काम करणार असून, पक्षाकडून सेक्टर प्रमुखाला ट्रेनिंग देण्यात येणार आहे. त्यांनतर सेक्टर प्रमुख उर्वरित ४ जणांना आणि ते संपूर्ण बुथला ट्रेनींग देणार आहेत. त्यामुळे बूथ पातळीपासूनच कार्यकर्त्यांची फळी तयार होणार आहे.

काँग्रेसचे संघटन मजबूत व्हावे या हेतूने पुण्यात झालेल्या चर्चा सत्रात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आली असून त्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत सेक्टर प्रमुखाला ट्रेनिंग दिली जात आहे. कोकणात सेक्टर प्रमुखांना ट्रेनिंगला सुरू झाली आहे. राज्यभर हे काम जोमाने सुरू होणार आहे. सत्तेत असताना काँग्रेसने जनसामान्याच्या हिताचे निर्णय घेतले. मात्र त्याची प्रसिद्धी कधी केली नाही. त्यामुळे काँग्रेसचे ध्येय धोरण, त्यांनी केलेली कामे लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम या माध्यमातून केले जाणार आहे.  – संतोष केणे, प्रदेश सचिव   

                                                                                                                                  

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -