घरमुंबईअसहिष्णु सरकारचा अंत जनताच करेल - सचिन सांवत

असहिष्णु सरकारचा अंत जनताच करेल – सचिन सांवत

Subscribe

'जनतेने या असहिष्णु सरकारमुळे लोकशाहीला निर्माण झालेला धोका ओळखला असून, आगामी निवडणुकीत या सरकारचा अंत निश्चित आहे', असं वक्तव्य काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.

अमोल पालेकर यांना भाषण करू न देण्याच्या प्रकारावरुन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत भाजपवर घणाघाती टीका केली आहे. ”देशपातळीवर गेल्या पाच वर्षापासून असहिष्णुतेचे वातावरण पहायला, अनुभवायला मिळते आहे. अमोल पालेकर यांना बोलू न देणे ही घटना त्याचाच एक भाग आहे. लोकतांत्रिक विचारधारेला घातक असलेल्या मोदी सरकारचे केवळ काही महिनेच शिल्लक राहिले असून या असहिष्णुतेचा अंत आता जनताच करेल”, अशी टीका सावंत यांनी केली आहे. सावंत म्हणाले की, ‘असहिष्णु विचारधारा भारतीय नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य संस्थापक बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी हुकुमशहा मुसोलीनीची भेट घेऊन ही विचारधारा भारतात आणली. गोळवलकरांनी हिटलरबद्दल असलेल्या प्रेमातून या विचारधारेची जोपासना केली. संघाच्या विविध शाखांमधून या विचारधारेचा अंमल गेली अनेक वर्ष केला जात आहे.’


वाचा: माझं भाषण मध्येच का थांबवलं? अमोल पालेकरांचा सवाल

‘मात्र, आता स्वतः संघ प्रचारकच पंतप्रधान झाल्याने शासकीय यंत्रणामार्फत ही विचारधारा रूजवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मॉब लिचिंगच्या वाढत्या घटना, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एस. कलबुर्गी, गौरी लंकेश या विचारवंतांच्या हत्या तसंच कलावंत आणि साहित्यिकांची गळचेपी विरोधकांना देशद्रोही नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न, यंत्रणांचा गैरवापर यातून असहिष्णुता स्पष्टपणे दिसून येत आहे. या सरकारला विरोध सहन होत नाही. प्रसिद्ध साहित्यिका नयनतारा सहगल यांच्याबाबतीतही हेच दिसून आले होते. काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता या असहिष्णु विचारधारेचा निकराने विरोध करेल. जनतेनेही या असहिष्णु सरकारमुळे लोकशाहीला निर्माण झालेला धोका ओळखला असून आगामी निवडणुकीत या सरकारचा अंत निश्चित आहे’, असंही सचिन सांवत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -