घरमुंबईकाँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी करणार शिवसेनेत प्रवेश

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी करणार शिवसेनेत प्रवेश

Subscribe

प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आज त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. प्रियंका यांनी काँग्रेसला आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला असून त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. यासंदर्भात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. आज दुपारी १:३० वाजता ते पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा करणार आहेत. प्रियंका य़ांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटच्या अबाऊट अस मधून काँग्रेस प्रवक्त्याची माहिती काढून टाकली आहे.

- Advertisement -

 

काँग्रेस पक्षाला का दिली सोडचिठ्ठी?

गेल्या काही दिवसांपासून मथुरा येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका यांच्याशी गैरवर्तवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावर कारवाई करत राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी संबंधित लोकांना पार्टीतून निलंबित केले होते. परंतु, काहीच दिवसांत त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. त्यामुळे प्रियंका चतुर्वेदी नाराज झाल्या होत्या. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन नाराजी व्यक्त केली होती. ‘स्वतःचे रक्त आटवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपेक्षा महिलांशी गैरवर्तणूक करणाऱ्या गुंडाना पक्षात जास्त किंमत आहे. ज्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आपल्याला धमकावले, त्यांना कोणतीही शिक्ष न देता सोडले जात आहे. हे फार दुर्भाग्यपूर्ण आहे’, असे प्रियंका आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -