घरमनोरंजन#पुन्हानिवडणूक ट्विटवरून उफाळला वाद; म्हणे हा तर प्रमोशन फंडा!

#पुन्हानिवडणूक ट्विटवरून उफाळला वाद; म्हणे हा तर प्रमोशन फंडा!

Subscribe

मराठी कलाकारांकडून #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरून एकाच वेळी ट्विट केले असून यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्षेप घेतला आहे.

राज्यात सध्या एकच मुद्दा गाजत आहे, तो म्हणजे कोणाचं सरकार येणार. एनडीएला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत न मिळाल्यामुळे भाजप आणि शिवसेना दोघेही मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहेत. तर दुसरीकडे राज्यात मध्यावती निवडणुका होणार का याचीही चर्चा होत आहे. अशातच मराठी कलाकारांकडून #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरून एकाच वेळी ट्विट केल्याचे समोर आले आहे. यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आक्षेप घेतला असून भाजपच्या समर्थनार्थ हे ट्विट होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या संबंधी कलाकारांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काय म्हणाले सचिन सावंत

कोब्रो पोस्टच्या व्हिडिओमध्ये दिसले होते की भाजप पैसे देऊन हिंदी कलाकारांना ट्विट करायला सांगितले. मराठी कलाकारांचा असा वापर होऊ नये. भाजप असं करु शकते. भाजप सूडाचं राजकारण करुन इथे अनैतिकता पसरवत आहे. मराठी कलाकारांचा वापर ते करु शकतात यात नवीन काही नाही. असे होऊ नये, महाराष्ट्रात अशी प्रथा पडू नये, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. सगळ्या कलाकारांनी एकाच वेळी एकच ट्विट केल्याने काँग्रेस आक्षेप घेतला आहे. ज्या पद्धतीने एकचा वेळी कलाकार #पुन्हानिवडणूक हा हॅशटॅग वापरत आहेत. त्यातच भाजप आयटी सेलही सक्रिय झाली आहे. भाजप असं करु शकते. भाजप सूडाचे राजकारण करून इथे अनैतिकता पसरवत आहे, असा आरोपही सावंत यांनी केला आहे.

- Advertisement -

सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, वैभव गयानकर यांच्यासह अनेक कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा एक हॅशटॅग वापरुन ट्वीट केले आहे. तसेच हे त्यांच्या आगामी चित्रपच धुरळासाठीचे प्रमोशन असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कलाकारांकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण अद्याप आलेले नाही.

- Advertisement -

हेही वाचा –

सरकार शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचेच; भाजपशी आमची चर्चा नाही – शरद पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -