घरमुंबईडिप्लोमानंतर इंजिनीयरिंगला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा

डिप्लोमानंतर इंजिनीयरिंगला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा

Subscribe

दहावीनंतर तीन वर्षे इंजिनियरिंग डिप्लोमा शिक्षण घेतल्यानंतर इंजिनियरिंग पदवी शिक्षणासाठी थेट दुसर्‍या वर्षांच्या प्रवेश देण्यात येतो. मात्र कोरोनामुळे यंदा ही प्रवेश प्रक्रियाच अद्याप झालेली नाही.

इंजिनियरिंगच्या दुसर्‍या वर्षाचे वर्ग सुरू झाले तरीही डिप्लोमानंतर इंजिनियरिंगला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी उचित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

दहावीनंतर तीन वर्षे इंजिनियरिंग डिप्लोमा शिक्षण घेतल्यानंतर इंजिनियरिंग पदवी शिक्षणासाठी थेट दुसर्‍या वर्षांच्या प्रवेश देण्यात येतो. मात्र कोरोनामुळे यंदा ही प्रवेश प्रक्रियाच अद्याप झालेली नाही. अकरावी बारावी विज्ञान शिक्षण घेण्याऐवजी तंत्रशिक्षणातील पदविका घेऊन इंजिनीयरिंगची पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. ही पदविका मिळाल्यानंतर हे विद्यार्थी पदवीसाठी थेट दुसर्‍या वर्षात प्रवेश घेऊ शकतात. यासाठी जागांच्या १० टक्के जागा राखीव ठेवण्याचा नियम आहे. आधीच प्रवेशासाठी चुरस त्यात अद्याप प्रवेश प्रक्रिया जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांवर ताण येऊ लागला आहे. यातच द्वितीय वर्ष पदवी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्गही सुरू झाले आहेत. यामुळे ही प्रवेश प्रक्रिया कधी होईल याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. याबाबत युवासेनेचे प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. तसेच या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशी मागणी केली. यावेळी सामंत यांनी तातडीने तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ यांच्याशी संपर्क साधून ही प्रवेश प्रक्रिया लवकर जाहीर करावी. तसेच ज्या विद्यापीठांनी द्वितीय वर्ष इंजिनीअरिंगरच्या सत्र परीक्षा जाहीर केल्या आहेत. त्यांना त्या परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश द्यावेत अशा सूचना दिल्याचे प्रदीप सावंत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -