घरताज्या घडामोडीइंदू मिलमधील आंबेडकरांच्या स्मारकाला करोना व्हायरसचा फटका

इंदू मिलमधील आंबेडकरांच्या स्मारकाला करोना व्हायरसचा फटका

Subscribe

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकरिता लागणारे साहित्य हे चीनमधून येणार आहे. मात्र सध्या करोना व्हायरस धुमाकूळ घालत असल्यामुळे हे साहित्य भारतात येण्यास विलंब होणार आहे.

चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या करोना व्हायरसचा फटका आता मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या बांधकामाला बसणार आहे. या स्मारकासाठी उपयुक्त साहित्य हे चीनवरुन आणण्यास विलंब होणार असल्यामुळे स्मारकाच्या बांधकामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. २५० फुटांऐवजी पुतळ्याची उंची ३५० फूट आणि चबूतरा १०० फूट असा एकूण ४५० फुटांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र या करोना व्हायरसचा फटका स्मारकाच्या बांधकामाला बसणार आहे.

याच पार्श्वभूमीवर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बैठक घेतली. पुतळ्याचे काही साहित्य चीनकडून पुरविण्यात येणार आहे. परंतु सध्या चीनमध्ये करोना व्हायरस धैमान घातल्यामुळे हे साहित्य आणण्यास विलंब होणार आहे. तरी देखील लवकरात लवकर प्रशासकीय अधिकारी काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसंच स्मारकाचा प्रकल्प २०२० पर्यंत पूर्ण करण्याची सूचना अधिकाऱ्यांना आठवले यांनी दिली आहे. ११ ऑक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान मोदींनी भूमीपूजन केले होते. यावेळी कंत्राटदार शापूरजी पालनजी यांच्यामार्फत उभारण्यात येणाऱ्या ११०० कोटींच्या प्रकल्पाचा आढावा देखील घेण्यात आला.

- Advertisement -

पुतळ्याला लागणाऱ्या साहित्याची यादी आम्ही दिली आहे. कंत्राटदाराने ते साहित्य कुठून आणायचं याबाबत ठरवावे. बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यात आल्यामुळे डिझाईनमध्ये बदल करावे लागतील असं एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सध्या चीनमध्ये करोना व्हायरसमुळे आणखी १५० लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये एकूण २ हजार २५९२ लोक करोना व्हायरसमुळे बळी पडले आहेत तर ७७ हजार पेक्षा अधिक लोकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहान शहराचा दौरा केला.

- Advertisement -

हेही वाचा – दोन्ही वेळेस नापास झाला, म्हणून बसवला डमी विद्यार्थी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -