घरमुंबईशाळेच्या मैदानावर डाटा सेंटरची उभारणी

शाळेच्या मैदानावर डाटा सेंटरची उभारणी

Subscribe

पालिकेच्या विरोधात विद्यार्थ्यांचा मोर्चा

मुलांमध्ये खेळाडू वृत्ती जोपासली जावी म्हणून ठिकठिकाणी मैदाने आरक्षित केली जात आहेत. मात्र, ठाण्यात महापालिकेच्या खेळाच्या मैदानावरच डाटा सेंटरची उभारणी करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ पालिका शाळेचे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले.

स्मार्ट सिटीच्या ठाण्यात शालेय विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानच शिल्लक राहिले नसून आम्हाला आमच्या हक्काचे मैदान पुन्हा परत करा, अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू, असा इशारा देत हाजुरी येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक 126,32 शाळेतील विध्यार्थ्यांनी सोमवारी ठाणे महापालिकेवर मोर्चा काढला.

- Advertisement -

शाळेच्या मैदानाच्या जागेवर डाटा सेंटर उभारण्याचे काम सुरू असून यामुळे मैदान नाहीसे होणार आहे. या बांधकामामुळे शाळेच्या समोर उपलब्ध असलेले मैदान पूर्णपणे बाधित होत असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. हाजुरीमध्ये ठामपची उर्दूशाळा आहे. या शाळेत आसपासच्या परिसरातील हजारो मुले शिक्षण घेत आहेत. याच शाळेत इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतचे वर्ग भरतात. या शाळेत सकाळचे आणि दुपारचे अशी दोन सत्रे चालतात. शाळेच्या मुलांना खेळण्यासाठी, शारीरिक शिक्षणाच्या तासाला परेड करण्यासाठी मैदान उपलब्ध नाही. शाळेच्या मैदानावरच मुले आपल्या मैदानी कसरती करतात. मात्र, या मैदानावर पालिका प्रशासनाच्या वतीने डाटा सेंटरची इमारत बांधण्यात येत असून त्या पद्धतीने काम सुरू आहे.

त्याठिकाणी शाळेच्या मैदानावर स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, शारीरिक शिक्षणाचे कार्यक्रम, कवायती यासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, भविष्यात मैदानच शिल्लक राहणार नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -