ओला, उबेर चालकांकडून प्रवाशांची लूट सुरुच

शनिवारी ओला, उबर चालकांनी संप मागे घेतला. कमी उत्पन्नावरील तोडग्यासाठी ऐन गर्दीच्या काळात भाडेवाढ करण्याचा पर्याय अमलात आणणअयात आला मात्र प्रवशांना याचा फटका बसत आहे.

Mumbai
ola taxi
ओला टॅक्सी

१२ दिवसानंतर ओला, उबेर चालकांनी आपला संप मागे घेतल्यानंतर प्रवांशाना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र ओला, उबर चालकांकडून प्रवाशांची लूट सुरु असल्याचे समोर आले आहे. तात्पुरत्या स्तरावर संप मागे घेतल्यानंतरही ओला, उबर चालकांकडून प्रवाशांची लूट सुरुच आहे. प्रवाशांना जादा भाडेवाढीचा सामना करावा लागत आहे. शनिवारी ओला, उबर चालकांनी संप मागे घेतला. कमी उत्पन्नावरील तोडग्यासाठी ऐन गर्दीच्या काळात भाडेवाढ करण्याचा पर्याय अमलात आणणअयात आला मात्र प्रवशांना याचा फटका बसत आहे.

प्रवाशांची लूट सुरुच

सणासुधीच्या काळामध्ये खरेदीसाठी सर्व जण बाहेर पडतात. शनिवार, रविवारी खरेदीसाठी मुंबईकर बाहेर पडल्याने ओला, उबरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. मागणी वाढल्याने भाडेदरात वाढ होण्याचे सूत्र अवलंबूव ओला, उबेर कंपन्यांनी ऐन गर्दीच्या वेळेचे कोष्टक मांडले आहे. संपापूर्वीच या कोष्टकात बदल करण्याची मागणी सातत्याने सुरु आहे. येत्या १५ नोव्हेंबरला ओला, उबर चालकांच्या मागण्यांवर अंतिम निर्णय होणार आहे. तोपर्यंत कंपन्यांनी सणासुधीच्या काळात गर्दीच्या वेळेसाठी कोष्टक बदलले.

प्रवाशांमध्ये नाराजी

टॅक्सी चालक- मालकांना आर्थिक आधार मिळणार आहे. पण हा भार सर्वसामान्यांवर येत आहे. दिवाळी आणि रविवार असल्याने ओला- उबरची मागणी वाढली. सुट्टी आणि सणाची खरेदी असल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे ओला, उबरचा वेग कमी झाला आणि बिल वाढले. बिल वाढत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here