घरमुंबईएक खड्डा चुकवला, दुसरा चुकवताना मात्र अपघात

एक खड्डा चुकवला, दुसरा चुकवताना मात्र अपघात

Subscribe

 पूर्व द्रूतगती महामार्ग...त्यावर भरधाव धावणार्‍या गाड्या...या वेगातच मध्येच असणारा एक खड्डा चुकवायला ते जातात...तोच लगेच दुसरा खड्डा...वाहन त्या खड्ड्यात जोरात आदळते...वाहनाचा टायर फुटतो...गाडी डीव्हायडरवर आदळते. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते वाचतात. ही कहाणी आहे पोलीस हवालदार ईश्वर गावडे यांची.

पूर्व द्रूतगती महामार्ग…त्यावर भरधाव धावणार्‍या गाड्या…या वेगातच मध्येच असणारा एक खड्डा चुकवायला ते जातात…तोच लगेच दुसरा खड्डा…वाहन त्या खड्ड्यात जोरात आदळते…वाहनाचा टायर फुटतो…गाडी डीव्हायडरवर आदळते. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते वाचतात. ही कहाणी आहे पोलीस हवालदार ईश्वर गावडे यांची. सध्या गावडे यांच्यावर फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून मुंबईतील जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बुधवारी कांजूरमार्ग डंम्पिंगजवळ पोलीस हवालदार ईश्वर गावडे (वय-५७) यांचा अपघात झाला.

या अपघातात त्यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर तर डोक्याला गंभीर जखम झाली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गावडे हे चुनाभट्टी पोलीस ठाण्यामध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहेत. बकरी ईदच्या बंदोबस्तासाठी गावडे पहाटेच कर्तव्यावर निघाले होते. सकाळी ६.३० च्या सुमारास त्यांची मारुती झेन ही कार कांजूर डंम्पिंगजवळ आली. यावेळी रस्त्याच्या मधोमध असलेला मोठा खड्डा त्यांनी चुकविला. याचवेळी पुढे दुसरा खड्डा असल्याची कल्पना त्यांना नव्हती. कार नेमकी याच खड्ड्यात जोरात आदळली. कारचा पुढील बाजूकडील डाव्या बाजूचा टायर फुटला. ती डीव्हायडरवर आदळली. यात तावडे जखमी झाले. याची माहिती विक्रोळी पोलिसांना मिळताच त्यांनी तावडे यांना फोर्टीस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यानंतर त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली.

- Advertisement -

मार्गावरील खड्डे संबंधित प्रशासनाने त्वरित बुजवले पाहिजेत. खड्ड्यांमुळे जीवही जाऊ शकतो. माझे वडील सुदैवाने बचावले.– तेजस गावडे ( ईश्वर गावडे यांचा मुलगा)

हे धोकादायक खड्डे प्रशासनाने बुजवायला हवेत. या ठिकाणी का दुर्लक्ष केले जात आहे, हेच समजत नाही. आधीच येथे वाहनांचा वेग प्रचंड असतो. माणूस मेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? – भूषण भिसे, (दुचाकीस्वार)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -