घरमुंबईमहिला कॉन्स्टेबल निर्मित सॉफ्टवेअरचा गुन्हेगारीवर चाप

महिला कॉन्स्टेबल निर्मित सॉफ्टवेअरचा गुन्हेगारीवर चाप

Subscribe

मुंबईतील एका महिला कॉन्स्टेबलने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले आहे. ३५ वर्षीय महिला कॉन्स्टेबल निता बालुभाई किडेछा हीने क्राईम एण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क एण्ड सिस्टम्स (CCTSNS) हे सॉफ्टवेअर तयार केलं आहे. गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्यासाठी हे सॉफ्टवेअर महत्वपूर्ण ठरणार आहे. बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये निता या कार्यरत आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

स्थानिक भाषेत माहिती होते भाषांतरीत
सीसीटीएनएस या सॉफ्टवेअरमध्ये गार्गी नावाचा फाँट आहे. हा फाँट कोणत्याही भाषेमध्ये असणारी माहिती स्थानिक भाषेमध्ये भाषांतरीत करण्यात मदत करतो. उदारणार्थ गुजरातमधील गुजराती आणि पंजाबमधील पंजाबी भाषेत माहिती भाषांतरीत होते. महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी आणि कॉन्स्टेबल गार्गी फाँटचा वापर करतात. मात्र आता हा फाँट उपलब्ध नसल्यामुळे त्यांना माहिती टायपिंग करायला अडचणी येत असल्याचे नीता यांनी सांगितले.

- Advertisement -

फॉन्टसाठी तयार केली पुस्तिका
पोलीसांना संगणकाचे प्रशिक्षण देत असताना नीता यांना या समस्येची जाणीव झाली. हे सॉफ्टवेअर स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने कोणीही ते शिकवू शकत नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. तसंच या फाँटच्यासंदर्भात कोणतिही माहिती उपलब्ध नव्हती. फाँट आणि टायपिंगसंदर्भातील अनेक समस्या पाहून मी फाँटच्यासंदर्भात एक छोटीशी पुस्तिका तयार करण्याचा निर्णय घेतला. आता ही २३ पानांची पुस्तिका पोलिसांना फाँट शिकण्यासाठी मदत करत असल्याचे नीता यांनी सांगितलं. त्यानंतर नीता यांनी आपल्या सहकार्यांना या फाँटच्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

पोलिसांना या सॉफ्टवेअरचा फायदा
आम्ही आता सीसीटीएनएस हे सॉफ्टवेअर वापरत असून आता सर्वकाही ऑनलाईन झाले आहे. अनेक कॉन्स्टेबल या सॉफ्टवेअरमध्ये नोंद करायची टाळाटाळ करायचे कारण त्यांचा टायपिंग स्पीड खूप कमी होता. मात्र नीता यांनी आमची कार्यशाळा घेतल्यानंतर आमचा टायपिंगचा स्पीड वाढला असल्याची माहिती नीता यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बाळासाहेब घाडगे यांनी दिली. नीता यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते अशी माहिती घाडगे यांनी दिली. तर या सॉफ्टवेअरचा वापर करण्यास आम्ही सुरुवात केली आहे. याच्या माध्यमातून आम्हाला देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या गुन्हेगारांविषयी माहिती मिळत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितल आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -