घरCORONA UPDATEकल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा फैलाव; करोनाबाधित आता ७०० पार!

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा फैलाव; करोनाबाधित आता ७०० पार!

Subscribe

मुंबई, ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच कल्याण डोंबिवलीतही कोरोना वेगाने पसरत आहे. कल्याण-डोंबिवलीत शनिवारी ३० नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. गेल्या सहा दिवसांत इथे २२८ नवे रूग्ण आढळून आले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये आतापर्यंत करोनाबाधितांचा आकडा ७०० पार झाला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

करोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कल्याण डोंबिवलीकरांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे. महापालिका क्षेत्रात शनिवारी ३० नवीन रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोनाबाधित रूग्णांची संख्या ७२७ झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये कल्याणामधले १२ रूग्ण, डोंबिवलीत १७ रूग्ण आणि टिटवाळ्यातल्या एका रूग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत १८ रूग्णांचा इथे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ७२७ रूग्णांपैकी उपचारानंतर बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या २६८ झाली आहे. त्यामुळे ४४१ रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, मुंबई ठाण्यात नोकरीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असून त्यांच्या संपर्कातील लोकांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रूग्णांमध्ये लहान बालक आणि मुलांचाही समावेश वाढत आहे. दिवसागणिक वाढत्या रूग्णसंख्येमुळे कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -