Corona Cases : मुंबईत कोरोनाचे १०६६ नवे रुग्ण, ४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू!

corona

मुंबईमध्ये १०६६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २३ हजार ३९७ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६७९६ वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये १०६६ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३६ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३६ पुरुष तर १२ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३५ जण हे ६० वर्षांवरील, तर १२ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

mumbai corona cases

मुंबईत कोरोनाच्या १२३२ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ९६ हजार ५८६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के आहे. तर शहरात १९ हजार ७१८ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.