घरमुंबईकोरोनामुळे ४८ वर्षीय व्यक्तीला मेंदूचा झटका; बोलण्याची क्षमताही गमावली

कोरोनामुळे ४८ वर्षीय व्यक्तीला मेंदूचा झटका; बोलण्याची क्षमताही गमावली

Subscribe

उल्हासनगरमधील एका कोरानाबाधित व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक (मेंदूचा झटका) झाला. त्यामुळे त्याच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. त्यामुळे कोरोना अधिकच घातक ठरत आहे.

कोविड -१९ मुळे मेंदूवरही आघात होत असल्याच्या घटना घडत आहेत. उल्हासनगरमधील एका कोरानाबाधित व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक (मेंदूचा झटका) झाला. त्यामुळे त्याच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला. त्यामुळे कोरोना अधिकच घातक ठरत आहे.

कोरोनाच्या लक्षणांमध्ये सातत्याने बदल होत आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाचा विषाणू फक्त फुफ्फुसावरच नाही, तर शरीरातील अन्य अवयवांवरही आघात करत असल्याचे समोर येत आहे. उल्हासनगरमधील तिरूपती स्वामी (४८) यांना काही दिवसांपासून ताप, खोकला आणि अंगदुखीचा त्रास होत होता. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. त्यांना बोलता येत नसल्याने त्यांची एमआरआय चाचणी केली असता त्यांच्या मेंदूच्या डाव्या अर्ध्या भागात ब्रेन स्ट्रोक असल्याचे निदान झाले. मात्र त्यावर स्पीच थेरपीद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले.

- Advertisement -

फुफ्फुसांपुरताच मर्यादित असणारा हा आजार आता मेंदूवरही परिणाम करत आहे. मेंदूचा स्ट्रोक ही अतिशय गंभीर समस्या आहे. यावर वेळीच निदान व उपचार होणे गरजेचे आहे. उपचारास विलंब झाल्यास याचा परिणाम अवयवांवर आणि भाषेवर होऊ शकतो, वोक्हार्ट रूग्णालयातील सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखीजा यांनी सांगितले. स्ट्रोकचा झटका आल्याने रूग्णाच्या बोलणार्‍या क्षमतेवर परिणाम झाला होता. अशा स्थिती आम्ही त्यांच्यावर स्पीच थेरपीद्वारे उपचार केले. आता ते सर्वसामान्यांप्रमाणे बोलू लागले आहेत, असे स्पीच थेरपिस्ट नूतन कोरगावकर यांनी सांगितले.

रूग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्यातच मेंदूचा झटका आल्याने त्यांना बोलता येत नव्हते. संवाद साधतानाही अडचणी जाणवत होत्या. वैद्यकीय भाषेत याला अप्सिया असे म्हणतात. अशा परिस्थितीत रूग्णांवर मेलोडिक इनटोनेशन थेरपी (एमआयटी) द्वारे उपचार करण्याचा निर्णय घेतला. ही थेरपी शब्द व अर्थपूर्ण भाषा सुधारण्यास करण्यात मदत करते.
– प्रशांत मखीजा, सल्लागार न्यूरोलॉजिस्ट, वोक्हार्ट रुग्णालय
स्ट्रोकचा तीव्र झटका आल्याने मी बोलू शकत नव्हतो. त्यामुळे कुटुंबात चिंतेचे वातावरण होते. या कठिण काळात मार्गदर्शन करणार्‍या डॉक्टरांच्या टीमचे आम्ही आभारी आहोत. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मी पुन्हा बोलू शकतो.
– तिरुपती स्वामी, रुग्ण
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -