घरमुंबईकोरोनामुक्त झालात, कशी घ्याल काळजी

कोरोनामुक्त झालात, कशी घ्याल काळजी

Subscribe

कोरोनामुक्त झाल्यानंतर आरोग्याची काळजी कशी घ्यावी, नायर रुग्णालयाची पोस्ट कोविड माहिती पुस्तिका

कोरोनामुक्त झाल्यानंतर आरोग्याची काळजी कशी घ्यावी, कोणता आहार घ्यावा, कोणती पथ्ये पाळावी याची माहिती रुग्णांना मिळावी यासाठी पालिकेच्या नायर रुग्णालयाकडून पोस्ट कोविड माहिती पुस्तिका तयार केली आहे. उपचारानंतर रुग्णांना घरी पाठवताना तसेच पोस्ट कोविड ओपीडीमध्ये ती रुग्णांना देण्यात येत आहे.

कोरोनामुक्त झाल्यानंतरही नागरिकांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. त्याचबरोबर त्यांना अनेक आजारही जडत आहेत. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी नायर रुग्णालयाकडून पोस्ट कोविड माहिती पुस्तिका बनवली आहे. शोधनिबंध प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावलेल्या नायर हॉस्पिटलमधील भौतिकोपचार शाळा व केंद्राच्या मदतीने ही माहिती पुस्तिका बनवली आहे. ही पुस्तिका बनवण्यासाठी नायर धर्मादाय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आणि सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी मार्गदर्शन केले.

- Advertisement -

कोरोना रुग्णाला उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर तीव्र थकवा आणि अशक्तपणाच्या तक्रारी जाणवत आहेत. रूग्णालयातून घरी गेल्यानंतर रूग्णांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन ही पुस्तिका तयार केली आहे. यामध्ये सुधारित जीवनशैलीसह दैनंदिन जीवन पूर्ववत करण्यासाठी श्वसनाचे व्यायाम, विश्रांती आणि शारीरिक तंदुरुस्ती, आहारविषयक सल्ले यांचा समावेश आहे. ही पुस्तिका इंग्रजी, मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये आहे. यासाठी नायर रुग्णालयचे आहारशास्त्र विभाग, वैद्यक औषधशास्त्र विभाग, पल्मोनरी वैद्यकशास्त्र विभाग, भूलवैद्यकशास्त्र विभागातील डॉक्टरांनी ही पुस्तिका तयार केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -