धारावीत आढळला कोरोना रुग्ण

mumbai

देशात कोरोनोच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून सर्वाधिक ३०० कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात आढळले आहेत. याचदरम्यान आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत एक कोरोना पॉझीटीव्ह रु्ग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णाचे वय ५६ वर्ष असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तर त्याच्या कुटुंबीयातील १० जणांना क्वारनटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच रुग्ण ज्या इमारतीत राहतो ती सील करण्यात आली आहे.

धारावीची लोकसंख्या तब्बल १५ लाख असून ६१३ हेक्टर क्षेत्रफळावर ही झोपडपट्टी विखुरलेली आहे. या झोपडपट्टयांमध्ये घराघरात छोटे कारखाने असून मजुर व कामगारांचे येथे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. यामुळे या परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने मुंबईत कोरोनाचा धोका वाढला आहे.