घरCORONA UPDATEमुंबईत कोरोना चाचण्यांचं सूत्रबद्ध नियोजन; वाचा कुठे कशी होणार चाचणी!

मुंबईत कोरोना चाचण्यांचं सूत्रबद्ध नियोजन; वाचा कुठे कशी होणार चाचणी!

Subscribe

मुंबईत वाढत्या कोरोना संशयितांच्या स्त्राव नमुन्यांची चाचणी करण्यासाठी मुंबईतील विविध रुग्णालयं, सरकारी आणि खासगी लॅब्ज यांच्यामध्ये सूत्रबद्ध नियोजनाचा आराखडाच अतिरिक्त आयुक्तांनी परिपत्रक काढून जारी केला आहे.

देशभरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात सर्वाधित रुग्ण आढळलेल्या मुंबईत आता हळूहळू कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या आत्तापर्यंत १८१पर्यंत पोहोचली असून त्यातल्या १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, तर त्यासाठी कोरोनाची चाचणी करण्याची यंत्रणा सज्ज ठेवणं अत्यावश्यक झालं आहे. या पार्श्वभूमीवर चाचणी करताना मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या कोरोना तपासणी केंद्रांमध्ये समन्वय राहावा आणि गोंधळ उडू नये, यासाठी सूत्रबद्ध नियोजन केलं आहे. मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी परिपत्रक काढूनच या नियोजनाची माहिती दिली आहे. या नियोजनामध्ये मुंबईतल्या लॅब्ज आणि रुग्णालयांची कोरोना चाचण्यांसदर्भात जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

काय आहे नियोजन?

केईएम लॅबोरेटरी – घरांमधून आणि केईएम आणि सायन रुग्णालयातून घेतलेले सॅम्पल्स केईएम लॅबोरेटरीमध्ये तपासणीसाठी येतील. या लॅबची तपासणीची क्षमता संपल्यास ते सॅम्पल्स एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले जातील.

- Advertisement -

हाफकिन आणि एनआयव्ही – केईएम रुग्णालयाकडून नागरी वस्त्यांमधून जमा केलेले सॅम्पल्स या लॅब्जमध्ये तपासणीसाठी येतील.

कस्तुरबा लॅब – कस्तुरबा रुग्णालयाच्या आयपीडी आणि नायर रुग्णालयात घेतलेले सॅम्पल्स तपासणीसाठी या लॅबमध्ये येतील.

- Advertisement -

जे. जे. हॉस्पिटल लॅब – मुंबई उपनगरीय रुग्णालय आणि बाहेरच्या जिल्यातून जमा केलेले सॅम्पल्स जे. जे. हॉस्पिटलच्या लॅबमध्ये तपासणीसाठी येतील.

खासगी लॅब – जे. जे. हॉस्पिटल आणि इतर खासगी हॉस्पिटलमधून जमा केलेले संशयित कोरोनाग्रस्तांचे सॅम्पल्स त्यांच्या प्राथमिकतेनुसार जे. जे. हॉस्पिटल लॅब किंवा खासगी लॅब्जकडे तपासणीसाठी पाठवले जातील.

‘मुंबईत होणाऱ्या संशयित कोरोनाग्रस्तांच्या स्त्रावांच्या नमुन्यांची तपासणी करण्यासाठी या प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. ते पाळणं संबंधितांवर बंधनकारक राहील’, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

corona test planning in mumbai


CoronaVirus: देशात ३५ खासगी लॅब्सला करोना चाचणीची परवानगी, मुंबईत ५, महाराष्ट्रात ९ लॅब्ज
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -