घरताज्या घडामोडीकोरोना लस मुंबईत दाखल, परळच्या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणूक

कोरोना लस मुंबईत दाखल, परळच्या कोल्ड स्टोरेजमध्ये साठवणूक

Subscribe

कोरोना लसीचे डोस परळ येथील कोल्ड स्टोरेजमध्ये साठवण्यात येणार आहेत. कांजूरमार्ग येथील कोल्ड स्टोरेजचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही त्यामुळे कोरोना लसीची साठवणूक परळच्या कोल्ड स्टोरेजमध्ये करण्यात आली आहे. याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात होणार आहे. बुधवारी १ लाख ३९ हजार कोरोना लसीचे डोस पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटमधून मुंबईत दाखल झाल्या आहेत. या कोरोना लसीचे डोस परळ येथील कोल्ड स्टोरेजमध्ये साठवण्यात येणार आहेत. कांजूरमार्ग येथील कोल्ड स्टोरेजचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही त्यामुळे कोरोना लसीची साठवणूक परळच्या कोल्ड स्टोरेजमध्ये करण्यात आली आहे. याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. परळच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दहा लाख कोरोना लसीचे डोस साठवता येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

कोव्हीशिल्ड’लसीचा पहिला साठा कडक पोलीस बंदोबस्तात पुणे येथील लस निर्मिती करणाऱ्या ‘सिरम इन्स्टिट्यूट’ येथून विशेष वाहनाद्वारे मुंबईत आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास दाखल झाला आहे. एफ/दक्षिण विभाग कार्यालयात लस साठा वाहनाचे मुंबई महापालिका प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तळमजल्यावरील लस भांडार कक्षात विहित प्रक्रियेनुसार लस साठवण्यात आली आहे.

- Advertisement -

पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटमधून देशातील सर्व राज्यात कोरोना लसीच्या वितरणाला सुरूवात झाली आहे. लस पाठविण्यासाठी विमानतळावर कोल्ड स्टोरेज तयार करण्यात आले आहेत. मुंबईतील रूग्णालये कोरोना लसीकरणासाठी सज्ज झाली आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईतील तीन रूग्णालयामध्ये ड्राय रन पार पडला होता. मुंबईच्या केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्हि.एन. देसाई या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भाभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वांद्रे कुर्ला संकुलातील कोविड सेंटरमध्ये लसीकरण केले जाणार आहे.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. सुरूवातीच्या टप्प्यात देशात ३ कोटी लोकांना लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या आरोग्य सेवक डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. त्यानंतर वय वर्ष ५० पेक्षा पेक्षा अधिक असलेल्या वृद्धांना कोरोना लसीकरण केले जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सिरमची लस सहा राज्यांकडे रवाना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -