Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई कोरोना व्हायरसचा परिणाम पुरूषांच्या लैंगिक जीवनावर, Erectile dysfunction चा दीर्घकालीन साईडइफेक्ट

कोरोना व्हायरसचा परिणाम पुरूषांच्या लैंगिक जीवनावर, Erectile dysfunction चा दीर्घकालीन साईडइफेक्ट

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसचा परिणाम हा महिलांच्या मासिक पाळीवर होत असल्याचा प्रतिसाद जगभरातील महिलांनी दिला आहे. मासिक पाळी वेळेवर न येणे यासारखे परिणाम हे कोरोनाची लागण झालेल्या महिलांमध्ये दिसून आले आहेत. पण कोरोनाची लागण झालेल्या पुरूषांच्या आरोग्यावर दीर्घकालीन असे परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाची लागण झालेल्या पुरूषांमध्ये दिसून आलेला साईड इफेक्ट म्हणजे (erectile dysfunction) लैंगिक जीवनावर होत असल्याचे समोर आले आहे. हा परिणाम पुरुषांच्या आरोग्यावर दीर्घकालीन अशा स्वरूपात राहू शकतो, असे मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे पुरूषांच्या आरोग्यावर दीर्घकालीन असे परिणाम दिसून येण्याची शक्यता असल्याचे मत मेडएक्सपर्ट कंसल्टींगच्या संस्थापिका डेना ग्रेसन यांनी व्यक्त केले आहे. कोरोना व्हायरसमुळे न्युरोलॉजी कॉम्प्लिकेशनचा परिणाम होऊ शकतो. तसेच इरेक्टाईल डिस्फंक्शन हा परिणामही व्हायरसमुळे होऊ शकतो. म्हणूनच हा धोका मोठा आहे. व्हायरसमुळे फक्त तुमचा मृत्यू होऊ शकत नाही, तर कोरोना व्हायरसचे आरोग्यावर गंभीर परिणामही होत असल्याचे समोर आले आहे.

इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय ?

लैंगिक आयुष्यात इरेक्टाईल डिस्फंक्शन ही पुरूषांना हमखास भेडसावणारी समस्या आहे. पण आता कोरोना व्हायरसचा परिणाम हा इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. महिला आणि पुरूषांमध्ये शारीरिक संबंधामध्ये पुरूषांचे पुर्णपणे इरेक्शन न होणे, पुरूषांच्या लिंगामध्ये ताठरता नसणे, इरेक्शन कायम न ठेवता येणे, काही सेकंदातच इरेक्शन होणे ही लक्षणे प्रामुख्याने आढळली आहेत. कोणत्याही वयाच्या पुरूषामध्ये ही समस्या आढळून येते. साधारणपणे ४० वर्षानंतर ही इरेक्टाईल डिस्फंक्शनची समस्या पुरूषांमध्ये आढळू शकते असे आतापर्यंतच्या संशोधनात आढळले आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -