घरमुंबईकोरोना योद्ध्या आरोग्यसेविकांना फक्त १०० रुपये वाढ : नाराजीचा सूर

कोरोना योद्ध्या आरोग्यसेविकांना फक्त १०० रुपये वाढ : नाराजीचा सूर

Subscribe

नागरिकांच्या घरोघरी जाऊन कोरोनाविरोधात जनजागृती करणे, कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, वयोवृद्धांची तपासणी करणे असे प्रत्यक्ष कोरोना लढ्यात काम करणार्‍या आरोग्य सेविकांच्या सानुग्रह अनुदानात मुंबई महापालिकेने फक्त १०० रुपये वाढ करत त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

नागरिकांच्या घरोघरी जाऊन कोरोनाविरोधात जनजागृती करणे, कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, वयोवृद्धांची तपासणी करणे असे प्रत्यक्ष कोरोना लढ्यात काम करणार्‍या आरोग्य सेविकांच्या सानुग्रह अनुदानात मुंबई महापालिकेने फक्त १०० रुपये वाढ करत त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कोरोना लढ्यात आपल्या जीवाची बाजी लावणार्‍या आरोग्य सेविकांना तुटपुंजे सानुग्रह अनुदान दिल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आरोग्य सेविकांनी केलेल्या उत्तम कामामुळेच मुंबईत कोरोनाचे संक्रमण आटोक्यात आणणे शक्य झाले आहे. आरोग्य सेविकांनी मुंबईतील नागरिकांना दिलेली सेवा विसरता येणार नाही, अशी स्तुतीसुमने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत उधळली होती. तसेच आरोग्य सेविकांना दिवाळीची उत्तम भेट देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आरोग्य सेविकांच्या कामाची वाहवाह केली होती. परंतु प्रत्यक्षात त्यांना सानुग्रह अनुदान फक्त ४४०० रुपये जाहीर करण्यात आले. गतवर्षी आरोग्यसेविकांना ४३०० सानुग्रह अनुदान मिळाले होते. यात यंदा फक्त १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे फक्त कौतुकाने पोट भरत नाही, अशी भावना आरोग्य सेविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई महापालिकेने दिलेले सानुग्रह अनुदान म्हणजे आमच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे मत आरोग्य सेविकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

आरोग्य सेविकांनी कोरोना लढ्यामध्ये आपल्या जीवाची बाजी लावत झोपडपट्टी, वसाहतींमध्ये जाऊन कोरोना रुग्णांचा शोध घेणे, त्यांना रुग्णालयात दाखल करणे, नागरिकांची माहिती घेणे, त्यांची ऑक्सिजन लेव्हल तपासणे अशा महत्त्वाच्या भूमिका आरोग्य सेविका पार पाडत आहेत. यामध्ये सुरुवातीला त्यांना कोणतीही सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. यासंदर्भात आरोग्यसेविकांनी आवाज उठवल्यानंतर त्यांना पीपीई किट, मास्क, हॅण्डग्लोव्ह्ज देण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी करण्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका पार पाड आहेत. मात्र असे असतानाही मुंबई महापालिकेने दिलेल्या तुटपुंज्या सानुग्रह अनुदानामुळे आरोग्य सेविकांकडून नाराजीचा सूर व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -